शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर फोडून सोने उगवणारा ‘चाळके - द माउंटनमॅन’ -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:03 IST

दशरथ आयरे । अणुस्कुरा : आपल्या गावातील रस्त्यात असलेली टेकडीची अडचण व त्यामुळे झालेला पत्नीचा मृत्यू यामुळे पेटून उठलेला ...

ठळक मुद्देशाहूवाडीतील कांटे गावचा शेतकरी घण, सुतकी घेऊन डोंगराशी टक्कर; चार एकर शेती फुलविली

दशरथ आयरे ।अणुस्कुरा : आपल्या गावातील रस्त्यात असलेली टेकडीची अडचण व त्यामुळे झालेला पत्नीचा मृत्यू यामुळे पेटून उठलेला बिहारमधील दशरथ मांझी सर्वांच्याच परिचयाचा आहे. २५ फूट उंचीचा डोंगर हातोडा-चिन्हीने फोडून रस्ता करणाऱ्या दशरथ यांच्या जीवनावर मांझी-द माउंटनमॅन हा चित्रपटही प्रसिद्ध होऊन गेला. असेच एक माउंटनमॅन शाहूवाडी तालुक्याच्या डोंगरी व दुर्गम भागातील कांटे या गावातील ८0 वर्षीय आनंदा लक्ष्मण चाळके हे प्रसिद्धीस आले आहेत.

आपल्या परिवाराच्या उपजीविकेसाठी गेल्या ४0 वर्षांपासून एकट्याने रात्रंदिवस राबून खडकाळ डोंगर फोडून चार एकर शेतजमीन तयार केली. त्या जमिनीत ऊस व मका पीक जोमाने बहरले आहे.चाळके २0-२२ वर्र्षांचे असताना मोलमजुरीसाठी मुंबईला गेले; पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना गावी परतावे लागले. परिणामी, कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. उदरनिर्वाहाचे साधन काहीच नव्हते. होता फक्त वडिलोपार्जित काळ्या दगडांचा डोंगर.

रोजगार मिळेना. कुटुंबाची उपासमार होऊ लागली. त्यामुळे त्यांनी ठरवले की, या डोंगराशी दोन हात करायचे आणि ते कामाला लागले. त्या दिवसापासून त्यांचे घण, सुतकी, टिकाव, फावडे घेऊन काळ्या दगडांशी टक्कर देणे सुरू झाले. दगड-धोंड्यांशी चाललेला हा संघर्ष गेली ४0 वर्षे आजही सुरूच आहे. सकाळी उठायचे ते थेट दगडाला भिडायचे. रस्त्याने ये-जा करणाºया लोकांनी त्यांना वेड्यात काढले; पण दुर्लक्ष करीत ते राबतच राहिले. पत्नीने आणलेली भाकर खाताना तेवढाच काय तो घडीभर विसावा. आठवड्यातून एक दिवस दुसºयाच्या शेतावर पत्नीसोबत मजुरीला जायचे व त्याच पैशांवर घरखर्च भागवायचे हा त्यांचा नियम आजही कायम आहे.

सतत ४0 वर्षे राबून चार एकर शेतजमीन तयार केली. या जमिनीत पिके घेण्यासाठी त्यांच्याबरोबर मुलगाही साथ देत आहे. उर्वरित डोंगर फोडण्याचे काम आजअखेर सुरूच आहे. चाळके मामांनी आयुष्यभर चप्पल घातलेले नाही. वर्षातून दोन वेळाच ते दाढी करतात. नवीन कपडे फक्त दिवाळी व होळीलाच घालतात, अशी साधी राहणी. मात्र, आता डोलणारी पिके पाहून कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते. आता हातात पूर्वीसारखी ताकत राहिली नाही. शरीर थकले आहे. तरीपण देहात जीव असेपर्यंत या डोंगरातील दगडांची माती करण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.80 वर्षीय आनंदा लक्ष्मण चाळके हे शाहूवाडी तालुक्यातील कांटे येथील रहिवासी.40 वर्षांपासून कच्च्या दगडांचा खडकाळ डोंगर फोडून तयार केली चार एकर शेतजमीन20 वर्र्षांचे असताना मोलमजुरीसाठी मुंबईला गेले; पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना गावी परतावे लागले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी