शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा-जत्रा थंडावल्या, पण इथे घडतेय मुलांना वाळवंटातील सफर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 21:29 IST

गावाकडचं वातावरण म्हणजे यात्रा जत्रेचा सध्याचा माहोल. गावोगावी असणाऱ्या यात्रा - जत्रांचे लहान मुलांना आकर्षण असते.

दुर्वा दळवी कोल्हापूर : गावाकडचं वातावरण म्हणजे यात्रा जत्रेचा सध्याचा माहोल. गावोगावी असणाऱ्या यात्रा - जत्रांचे लहान मुलांना आकर्षण असते. वेगवेगळी खेळणी मौज मजा मस्ती लहान मुलांना इथे करता येते. ह्या यात्रा जत्रेसाठी मुल आतुरतेने वाट पाहतात. गेल्या काही दिवसात मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कोरोनाने हिरावून नेला आहे. त्यामुळे काही वेगळं करता येत का? यासाठी ती संधीच शोधत असतात. मोबाईलचे वेड मुलांना लागलं असल तरी ते शहरापूर्तेच मर्यादित. ग्रामीण भागात तितके मोबाईलचे वेड मुलांना नाही. त्यामुळे ती कुठे शेतात बागड, नदी - विहिरीवर पोहायला जाऊन आनंद शोधणारी ही सर्व मुलं. 

कोल्हापुरातील एका गावात मात्र आता मुलांना चक्क वाळवंटातील सफर घडत आहे. कागलमधील मुरगूड येथे दोन तीन दिवसांपूर्वी एक नाही दोन नाही तर तब्बल अठरा उंट असलेला तांडा आला. गावातल्या लोकांना नेकम कळेना आपण कोल्हापुरातच आहोत की राजस्थानमध्ये. अशी ही उंटांची दिमाखात स्वारी शहरात आली. यानंतर गावातील लहानथोर मंडळी ह्या उंटांच्या तांड्यांकडे निरखून पाहू लागली. म्हशी, घोडे, बैल अन् गाई रस्त्याने जाताना पाहायची सवय तिथे ही उंटाची स्वारी आल्याने त्यांना काही कळेना. पण नंतर हे सगळ कोड उलगडल. उंटांचा तांडा घेऊन आलेली ही मंडळी बारामती दौड भागातली. त्यांनी राजस्थानातून हे उंट आणले असून तांड्यामध्ये एकूण १८ उंट आहेत. 

उंटाना घेऊन गावोगावी ही फिरत असतात. गावातील लहान मुलांना उंटावरची सफर ही घडवतात. तेवढाच मुलांनाही विरंगुळा मिळतो. अन् ह्या मंडळींना उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळतात. कोरोनामुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे जो तो आपल्याला जमेल ते काम करून आपल्या कुटुंब कबिल्याला जपण्यासाठी धडपड करतोय त्यातीलच ही उंट घेऊन आलेली मंडळी. 

गावोगावी असलेली मुले ही आनंदाने उंटावर बसून गावभर मस्त फिरून येतात. त्यामुळे गावात हा तांडा आला पासून मुले ह्या नव्या सफरीच्या आनंदात हरवलेली दिसतात. राजस्थानच्या वाळवंटात ही मुले कधी जातील न जातील पण स्वतच्याच गावात त्यांना ही छानपैकी सफर अनुभवायला मिळत आहे त्यामुळे गावकरी ही खुश आहेत. गावातील व्यक्ती ह्या तांडेवाल्यांची आपुलकीने चौकशी ही करतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर