कोल्हापूर : भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्'ात नंदवाळ येथे ११५ एकर भूखंड उपलब्ध झाला आहे. याठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. शासनाची भूमिका सकारात्मक असून जागेची पाहणी केली आहे. लवकरच हा निर्णय मार्गी लागेल, अशी माहिती राज्य राखीव पोलिस बलाच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनी दिली.कोल्हापूर जिल्'ासह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्'ांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन १ ते १६ चे मुख कार्यालय पोलीस मुखालयात आहेत. या कार्यालयाची वार्षीक तपासणी करण्यासाठी त्यागी मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. पोलीस आणि भारत राखीव बटालियनच्या वतीने त्यांना सन्मानगार्डची सलामी देण्यात आली.
दूपारपर्यंत त्यांनी कार्यालयीन कामकाजाची माहिती, निरिक्षन व टिप्पणी वाचन अधिकाऱ्यांकडून घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्य राखीव पोलीस बलाच्या १ ते १६ बटालियनच्या अधिकारी व जवानांसाठी जागेची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. जागे अभावी बटालियनचा मुक्काम दौंड (जि. पुणे ) येथे हलविण्यात आला आहे.
राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जात आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली.
ती सध्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण होऊन मुख्यालय उभारता येत नाही. या जागेवरील ‘वनसंज्ञा’ रद्द करण्याची प्रक्रिया खूप किचकट व वेळखाऊ असल्याने तेथील प्रस्ताव रद्द करून ‘वनसंज्ञा’ लागू नसलेल्या आणि गटनिर्मितीस योग्य जागेचा शोध जिल्'ामध्ये घेतला असता रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती.
परंतु त्याठिकाणीही काही समस्या निर्माण झाल्याने आता नंदवाळ (ता. करवीर) येथील ११५ एकर जागेची पाहणी केली आहे. त्याठिकाणी मुबलक पाणी, मुख्यालय, निवासस्थाने, शाळा, उद्यान, वाहनतळ उभारण्यासाठी सर्वसोयिनियुक्त जागा उपलब्ध आहे. या जागेची पाहणी दूपारी केली असून त्यासंबधीचा प्रस्तावही शासनाला दिला आहे. लवकरचं आर्थिक निधीच्या तरतूदीने प्रस्तावाला मंजूरी मिळणार आहे.
त्यासाठी आमचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, बटालियनचे समादेशक जयंत मिना, सहायक समादेशक अेस बी. जमदाडे, निरीक्षक अे. ई. जगताप, सी. व्ही. मकर, उपनिरीक्षक पी. अेल. गाडे, डी. बी. जाधव, डी. एन. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.पिरवाडी हॉलची पाहणीकोल्हापूर शहरापासून काही अंतरावर पिरवाडी आहे. याठिकाणी प्रशस्त हॉल आहे. बटालियनच्या जवानांची याठिकाणी राहण्याची व्यवस्था होवू शकते. तो हॉलही बटालियनला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक त्यागी यांनी हॉलची पाहणी केली.