शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर पेरणी, ३१ टक्के पूर्ण : रब्बी हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST

farmar, sataranews अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. अजूनही काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर पेरणी, ३१ टक्के पूर्ण : रब्बी हंगाम उशीर झाल्याने गहू अन् हरभरा क्षेत्रात होणार वाढ

सातारा : अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. अजूनही काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. गहू ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस यांचे क्षेत्र अत्यल्प आहे.ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून काही तालुक्यांत रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला. तर काही ठिकाणी ज्वारी पिकाचे नुकसान झाले. सध्या जिल्ह्यातील पेरणी ३०.४८ टक्के झाली आहे. तर ६६ हजार ७९२ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे.ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे. ज्वारीची आतापर्यंत ५९ हजार ६७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची आतापर्यंत १.५३ टक्के, मका ३०.०३ आणि हरभऱ्याची ९.३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.खटाव तालुक्यात ५१ टक्के क्षेत्रावर पेरणी...जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कºहाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी खटाव तालुक्यात ५०.८४ टक्के झाली आहे. त्यानंतर माणमध्ये ४२ टक्के झाली आहे. तर फलटण ३३, सातारा तालुका ३२, वाई ३०.५४, कऱ्हाड तालुक्यात २१.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर इतर तालुक्यात पेरणीचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर