शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

पेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:54 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.

ठळक मुद्देपेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगलीशिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या

कोल्हापूर : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर मात्र आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली. या कालावधीत पेरण्यांचा सपाटा लावण्यात आला. त्यानंतर चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने पेरण्यांची घाई उडाली; पण एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे पेरण्या करणे अवघड होऊन बसले आहे. त्यातही निचऱ्याच्या जमिनी असलेल्या ठिकाणी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची भर पावसात घाई सुरू आहे. खोल, गाळाच्या जमिनीत मात्र अजिबातच वाफसा नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत.रोहिणी आणि मृगात झालेले भात, सोयाबीन, भुईमूग चांगले उगवले आहे. भातामध्ये कोळपणी, भांगलणीची कामे भरपावसात सुरू आहेत. रोपलागणीसाठी टाकलेले नाचणी व भाताचे तरवे चांगलेच तरालले आहे. पुढील पंधरवड्यात याच्या लागणी सुरू होतील. उसालाही मिरगी डोस देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आडसाली लावणी सुरूआडसाली आणि पूर्व हंगामी ऊसलागणीचे पूर्वनियोजन म्हणून आता सऱ्या पाडून ठेवण्यात आल्या आहेत. बोंडल्यावर सोयाबीन, भुईमूग, मूग पेरून सरीमध्ये लावण करण्याचे नियोजन आहे. आता आडसाली लावणी सुरू झाल्या असून आतापर्यंत ७०३ हेक्टरवरील लावणी पूर्णही झाल्या आहेत.पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • भात - ४६ हजार ९३१
  • ज्वारी - ७८५
  • नागली - १ हजार ६८५
  • भुईमूग - १६हजार २६८
  • सोयाबीन - २४ हजार ६०५
  • ऊस - ७०३

कृषी विभागाकडे नोंद झाल्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ७४ हजार ६३९ हेक्टरपैकी ९३ हजार ५६१ हेक्टरवर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यात भाताची पेरणी सर्वाधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर