शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांना सौहार्द सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:13 IST

literature Kolhapur- कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेश हिंदी संस्थानने सौहार्द सन्मान पुरस्कार जाहीर केला. दोन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचे वितरण मार्चअखेरीस होणार आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांना सौहार्द सन्मान पुरस्कार उत्तर प्रदेश हिंदी संस्थानकडून घोषणा : मार्चअखेरीस वितरण

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेश हिंदी संस्थानने सौहार्द सन्मान पुरस्कार जाहीर केला. दोन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचे वितरण मार्चअखेरीस होणार आहे.हिंदी भाषेच्या प्रसार, प्रचाराचे काम करणारी उत्तर प्रदेश हिंदी संस्थान ही संस्था उत्तर प्रदेशच्या भाषा विभागाच्या अखत्यारित काम करते. या संस्थेने यावर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड साधन संकलन व प्रकाशन समितीच्यावतीने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याच्या दहा खंडांचे हिंदी भाषांतर प्रकाशित करण्यात आले आहे.

दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० पुस्तकांचे हिंदी भाषांतर राजकमल प्रकाशनाने प्रकाशित करण्याची अनुमती दिल्यानंतर डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. आत्तापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

या दोन्ही अनुवाद प्रकल्पांचे मुख्य संपादक डॉ. लवटे आहेत. त्यांच्या आणि संपादक डॉ. गिरीश काशिद, समन्वय संपादक डॉ. विजय शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथितयश अनुवादकांनी हा प्रकल्प पूर्ण केला.

या प्रकल्पांची दखल घेत मराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सोहार्दाची नोंद घेत डॉ. लवटे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांनी वि. स. खांडेकर यांचे समग्र साहित्य संपादनाचे काम केले आहे. ते सध्या विश्वकोश मंडळाचे आद्यसंपादक आणि साहित्यिक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे संपादन करत आहेत.

हा संयुक्त कामाचा व्यक्तिगत पुरस्कार आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याचे हिंदी भाषांतर केले. त्यातील २५ ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे. यानिमित्त मराठी आणि हिंदी भाषेत सौहार्द निर्मितीचे काम झाले. त्याची नोंद या पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेतल्याबद्दल उत्तरप्रदेश सरकारचे मी अभिनंदन करतो. या पुरस्काराचे श्रेय माझ्या सर्व अनुवादक विद्यार्थ्यांना देतो.- डॉ. सुनीलकुमार लवटे

अन्य पुरस्कार विजेतेया संस्थेतर्फे मुंबईच्या सूर्यबाला यांना प्रमुख भारत-भारती सन्मान, डॉ. दयानंद पांडे यांना लोहिया साहित्य सन्मान, डॉ. रामेश्वर प्रसाद मिश्र यांना महात्मा गांधी साहित्य सन्मान, तर वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीला राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन सन्मान पुरस्कार जाहीर झाला. प्रत्येकी चार लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर