शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मुलगीच झाली म्हणून थिमेट पाजून मारले, जन्मदात्या आई-वडिलांनीच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:46 IST

पुन्हा मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आई-वडिलांनीच संगनमताने अवघ्या दोन महिने वयाच्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथे घडली.

ठळक मुद्देपुन्हा मुलगीच झाली म्हणून थिमेट पाजून मारले, जन्मदात्या आई-वडिलांनीच केला खून शाहूवाडी तालुक्यातील सावर्डीतील घटना, आई-वडिलांना अटक

कोल्हापूर : पुन्हा मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आई-वडिलांनीच संगनमताने अवघ्या दोन महिने वयाच्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथे घडली.

याप्रकरणी आई जयश्री जयश्री पाडावे (वय २१) आणि वडील प्रकाश बंडू पाडावे प्रकाश पाडावे (२८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सिध्दी प्रकाश पाडावे ( वय २ महिने) असे मृत बालिकेचे नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सावर्डी येथील जयश्री व प्रकाश पाडावे यांना दोन वर्षांची प्रांजल ही पहिली मुलगी आहे. त्यांना यावेळी मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. पण पुन्हा मुलगीच झाल्याने ते नाराज झाले. यातूनच यातूनच त्यांनी संगनमताने ४ आॅक्टोबरला दोन महिने वयाच्या मुलीला थिमेट पाजून ठार मारले.

पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने थिमेट हे कीटकनाशक घरातून बाजूला टाकले. आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची अगोदर माहिती देण्यात आली होती. मात्र, या घटनेचा अधिक तपास करता सत्य समोर आले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे करीत आहेत.पोलीस उपनिरीक्षकच बनले फिर्यादीमृत बालिकेचे शवविच्छेदन करण्यासही या दाम्पत्याने वैद्यकीय अधिकारी यांना विरोध दर्शविला होता. याप्रकरणात फिर्याद देण्यास कुणीही पुढे येत नव्हते. अखेर या घटनेबाबत पोलिस उपनिरिक्षक महादेव जठार यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात आई-वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करुन या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.व्हिसेरा आल्यानंतर गुन्हा उघडवडिलांनी सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करण्यास डॉक्टरांना विरोध केला होता. तसेच पोलिसांसोबतही वाद घातला होता. मात्र, उत्तरीय तपासणी करण्यावर पोलिस आणि डॉक्टर ठाम राहिले. तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवला होता. त्याचा अहवाल बुधवारी येताच हा गुन्हा उघड झाला.पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांचा पाठपुरावाशाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला. मुलीच्या वडिलाच्या वर्तनावरुन तो काहीतरी लपवित असल्याची शंका त्यांना आली होती.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर