शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

राऊत यांच्याकडून सोनवडे गाव दत्तक

By admin | Updated: December 19, 2014 23:30 IST

जिल्ह्यातील तीन गावांना ‘आदर्श’ गाव होण्याचा मान

कोल्हापूर : राज्यसभा सदस्य आणि शिवसेना गटनेते खासदार संजय राऊत यांनी शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गाव आदर्श करण्यासाठी दत्तक घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन गावांना ‘आदर्श’ गाव होण्याचा मान मिळाला आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द, तर खासदार राजू शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यातील पेरिड गाव दत्तक घेतले आहे. सोनवडे गावचे सुपुत्र प्राचार्य दिलीप पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक म्हणजे सोनवडे गावची निवड खासदार राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील तीन गावे आदर्श होणार आहेत. सोनवडेची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. शासनाच्या सर्व योजना अतिशय पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवून राज्यात सोनवडे गाव आदर्श करण्याचा संकल्प खासदार राऊत यांनी केला आहे. प्राचार्य पाटील गेल्या २५ वर्षांपासून मुंंबई विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ हा विषय शिकवतात. त्यांनी सोनवडे गावच्या निवडीसाठी प्रयत्न केले. खासदार राऊत यांनी सोनवडे गावची निवड केल्याने या गावच्या विकासाला हातभार लागणार आहे. ज्या गावाने आम्हाला घडविले, त्या मातीचे ऋण फेडायचे असेल, तर त्या गावच्या विकासास हातभार लावायला हवा, असा प्रयत्न होता. व्यक्तिगत पातळीवर हे करणे शक्य नव्हते. त्यामुळे खासदार राऊत यांच्याकडे तसा पाठपुरावा केला व त्यांनी हे गाव दत्तक घेतले याचा खूप आनंद असल्याची भावना प्राचार्य पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)