शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

‘आर्या’च्या उत्सुकतेपोटी सोनाक्षी सुखरूप घरी!

By admin | Updated: November 6, 2016 00:38 IST

वाईतील घटना : मुलगी गुप्ता कुटुंबीयांच्या स्वाधीन

संजीव वरे -- पसरणी -अडीच वर्षांची सोनाक्षी गुप्ता ही मुलगी चार दिवसांपूर्वी खेळता-खेळता घरापासून लांब गेली. तिला बोलता येत नसल्याने काहीच कळेना.. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याने तिला वाई पोलिस ठाण्यात नेऊन दिले. तिला ओळखणाऱ्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या आर्या मांढरे हिच्या उत्सुकतेपोटी तिच्या घरचा शोध लागून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपली मुलगी सुखरूप मिळाल्याने गुप्ता कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.मूळचे उत्तरप्रदेश येथील असणारे गोविंद आणि रिंकी गुप्ता गेल्या सहा वर्षांपासून सिद्धनाथवाडी वाई येथे वास्तव्यास आहेत. गोविंद गुप्ता हे तयार कपडे गावोगावी जाऊन विकतात. घरी पत्नी रिंकी गुप्ता, आठ वर्षांची मोठी मुलगी साक्षी तर अडीच वर्षांची सोनाक्षी असा त्यांचा परिवार आहे. सोनाक्षी ही आईची नजर चुकवून खेळता-खेळता वाईच्या बसस्थानक परिसरात पोहोचली. तिला चांगले बोलता ही येत नसल्यामुळे घरचा पत्ता सांगता येत नसल्याने ती रडत रस्त्यावरून ये-जा करणारे लोक पाहत होती. त्यातील एका पादचाऱ्याने तिला त्याच अवस्थेत वाई पोलिसांच्या ताब्यात दिले. कामानिमित्त पोलिस ठाण्यामध्ये येणाऱ्या लोकांना त्या मुलीबाबत विचारपूस करत होते. त्यावेळी सिद्धनाथवाडी येथील नीलेश मांढरे हे काही कामानिमित्त पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिसांनी ही मुलगी सापडली आहे. तिला ओळखता का? म्हणून विचारले असता ते नाही म्हणाले. त्यानंतर ते आपल्या गाडीवरून येताना त्यांची मुलगी आर्याला शाळेतून आणण्यासाठी गेले. येताना ते आर्याला सांगत होते की, बाहेर कोठे जास्त लांब जायचे नाही, मुले चुकतात! आताच एक मुलगी पोलिस ठाण्यात पाहिली, असे सांगताच आर्याने ‘त्या मुलीला पाहायचे आहे, मला घेऊन चला,’ असा हट्ट धरला.अखेर दिवाळी गोड..दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. लहान मुलांच्या या आवडत्या सणात आपली मुलगी खेळता-खेळता खूपच लांब गेली याची माहिती तिच्या आईला नव्हती. ती घरकामातच व्यस्त होती. आर्या मांढरे हिने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला की पोलिस ठाण्यात कोणती मुलगी आहे ती मला पाहावयाची आहे. शेवटी वडिलांचा नाईलाज झाला ते शाळेतून आपल्या दुचाकीवर थेट पोलिस ठाण्यात घेऊन निघाले. तिला पाहिल्यावर तिचे घर माहिती आहे म्हणून वडिलांना सांगितले. यावरून गुप्ता कुटुंबीयांची मुलगी त्यांना सुखरूप मिळाली.