शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

‘जी २०’ परिषद: कोल्हापूरच्या सुपुत्राला राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:02 IST

कोल्हापूर : नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जी २०’ परिषदेसाठी येणाऱ्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याचा मान कोल्हापूरचे सुपुत्र आणि ...

कोल्हापूर : नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जी २०’ परिषदेसाठी येणाऱ्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याचा मान कोल्हापूरचे सुपुत्र आणि भारतीय वायुदलातील एअर कमाडोर अभय परांडेकर यांना मिळाला आहे.मूळचे शुक्रवार पेठेतील रहिवासी असलेले परांडेकर हे विद्यापीठ हायस्कूलमधून १९८८ साली दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९९५ साली ते वायुदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून दाखल झाले. युद्धादरम्यान हवेतल्या हवेत विमानामध्ये इंधन भरण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून ते दिल्लीतील पालम विमानतळावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान उड्डाणाची जबाबदारी सांभाळत आहेत.परांडेकर यांच्यावर राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आली. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून रविवारी रात्री हे राष्ट्राध्यक्ष परत जाईपर्यंत त्यांचे स्वागत आणि निरोपही देण्याची जबाबदारी परांडेकर यांनी उत्तम पद्धतीने पार पाडली.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक यांच्यासह अर्जेंटिना, फ्रान्स, सौदी अरेबिया, इटली, ब्राझील यांच्यासह २० राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत परांडेकर यांनी केले. विमानतळावर राष्ट्राध्यक्ष उतरल्यानंतर त्यांचे पहिले स्वागत परांडेकर यांच्याकडून केले जात होते. त्यांचे फोटो कोल्हापूरमधील समाजमाध्यमावर शेअर करण्यात आले आहेत.

अनेक वर्षे वायुदलात काम करत असताना अशा पद्धतीने राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्यासाठी संधी मिळेल असे वाटले नव्हते. परंतु ती अविस्मरणीय संधी मिळाली आणि कोल्हापूरकर असल्याचाही अभिमान वाटला, अशी प्रतिक्रिया परांडेकर यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरG20 Summitजी-२० शिखर परिषद