शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्र्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावा : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:59 IST

HasanMusrif Kolhapur : दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व घरांचा मोबदला,वसाहतींमधील अतिक्रमणे, जमीन मागणी अर्ज मंजुरी, वसाहतींमधील नागरी सुविधा असे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने मार्गी लावावेत, अशा सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिल्या. यापैकी किती प्रश्नांची सोडवणूक झाली याचा आढावा महिन्याने घेईन, असेही त्यांनी बजावले.

ठळक मुद्देदूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्र्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावा : मुश्रीफमहिन्यानंतर पुन्हा आढावा घेणार

कोल्हापूर : दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व घरांचा मोबदला,वसाहतींमधील अतिक्रमणे, जमीन मागणी अर्ज मंजुरी, वसाहतींमधील नागरी सुविधा असे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने मार्गी लावावेत, अशा सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिल्या. यापैकी किती प्रश्नांची सोडवणूक झाली याचा आढावा महिन्याने घेईन, असेही त्यांनी बजावले.काळम्मावाडी (दूधगंगा) प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, राधानगरी-कागल प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान उपस्थित होते.पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन मागणीसंदर्भात प्रशासनाकडून एकही अर्ज प्रलंबित ठेवला गेला नसल्याचे सांगितले. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी नागरी सुविधांच्या अनुषंगाने महामंडळाकडून निधी मिळालेला नाही. मात्र, शासनाकडून तो दिला गेल्याची माहिती दिली.यावेळी जमीन वहिवाटीत असलेल्या मूळमालकांचा अडथळा दूर करणे, वाटप आदेशानुसार जमिनींच्या कब्जाबाबत, लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र जमिनीचे संपादन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाप्रमाणे धरणग्रस्तांची नोकरभरती, प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये ग्रामपंचायतींची स्थापना, धरणग्रस्त वसाहतींच्या गावठाण हद्दीची निश्चिती, सार्वजनिक प्रयोजनासाठी नोंदणीकृत संस्थांचे भूखंड प्रकल्पग्रस्तांच्या दाखला हस्तांतरणामधील जाचक अटी, प्रकल्पग्रस्तांची ६५ टक्के रक्कम भरणा या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी उपवनसंरक्षक आर. आर. काळे, कविता कालेकर, धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष एन. एस.कांबळे, पीटर डिसोझा, दिलीप केणे यांच्यासह इतर अधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर