त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावी नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. या आकस्मिक घटनेने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. अनिकेत हा अविवाहित होता. त्यांच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. अनिकेत याचे वडीलही सैन्यातून निवृत्त झाले आहेत; तर आई ग्रामपंचायत सदस्य असून त्यांनी १० वर्षांपूर्वी विहिरीत पडलेल्या एका मुलाला वाचविल्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले होते.
यावेळी नायब तहसीलदार अशोक पाटील, सैनिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे, सुबराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश जावळे, नेसरीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, सरपंच सूरज जाधव, उपसरपंच डाॅ. एम. के. पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक जाधव, माजी सरपंच प्रा. एम. डी. पाटील, आदी उपस्थित होते.