शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी देवस्थानच्या पैशांचा विनीयोग व्हावा-चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:06 IST

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने मंदिर व्यवस्थापनाचे शासकीय यंत्रणांवरही मोठे दडपण होते

ठळक मुद्देमंदिर व्यवस्थापनाचे शासकीय यंत्रणांवरही मोठे दडपण ‘देवस्थान’च्या भावी योजनांना सदैव पाठबळ राहील, अशी ग्वाही

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने मंदिर व्यवस्थापनाचे शासकीय यंत्रणांवरही मोठे दडपण होते. मात्र, देवीचा उत्सव विनासायास पार पडला. देवीला येणारा पैसा हा भक्तांकडूनच दिला जात असल्याने त्याचा वापरही समाजासाठी झाला पाहिजे, असे मत मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात सेवा दिलेल्या व्यक्ती व संस्थांच्या सत्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे उपस्थित होत्या.पालकमंत्री म्हणाले, अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे परस्थ भाविकांची मोठी सोय होणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्याही २५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून काही दिवसांत विकासकामांना सुरुवात होईल.

खासदार धनंजय महाडिक यांनी सुवर्णपालखीचा उल्लेख करून यंदाचा नवरात्रौत्सव अधिक मोठ्या प्रमाणात पार पडल्याचे सांगितले. तसेच ‘देवस्थान’च्या भावी योजनांना सदैव पाठबळ राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी जीवनज्योती, व्हाईट आर्मी, पोलीस प्रशासन, महापालिका, ‘महावितरण’चे कर्मचारी, वाहतूक शाखा, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, अ‍ॅस्टर आधार, अ‍ॅपल हॉस्पिटल, महालक्ष्मी भक्त मंडळ, पत्रकार यांच्यासह मंदिरात सेवा दिलेल्या व्यक्ती व संस्थांचा गौरव केला. महेश जाधव यांनी प्रास्ताविक, संगीता खाडे यांनी आभार मानले.अंबाबाईचे मोबाईलवरही दर्शनयावेळी देवस्थान समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अंबाबाई अँड्रॉईड अ‍ॅपचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. या अ‍ॅपमुळे जगाच्या कानाकोपºयात असलेल्या भक्तांनाही अंबाबाईचे लाईव्ह दर्शन मिळणार आहे.

टॅग्स :Templeमंदिर