शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही मजबूतीसाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:11 IST

सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले.

ठळक मुद्देलोकशाही मजबूतीसाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा : दौलत देसाईशिवाजी विद्यापीठात ‘निवडणुका आणि सोशल मीडिया’वर परिसंवाद

कोल्हापूर : सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्यातर्फे आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

‘निवडणुका आणि सोशल मीडिया’ असा परिसंवादाचा विषय होता. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सोशल मीडियाच्या वापराबाबत तरुण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विवेक, संवाद, सुसंवाद या त्रिसूत्रीचा उपयोग सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने केला पाहिजे.कार्यक्रमात छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळित, आयटी तज्ज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ. रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ