शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आता ‘पुस्तकांची शोध’मोहीम-‘वाचनकट्टा’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:14 IST

स्मार्टफोन, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृती धोक्यात आली आहे, असे विधान सर्रास केले जाते. प्रत्यक्षात मात्र बदलत्या आधुनिक काळात वाचनसंस्कृती आणखी मजबूत करण्यासाठी वाचनकट्टा संस्थेकडून

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर राज्यभरातील शंभरहून अधिक युवक जाणून घेतात साहित्यविश्व

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : स्मार्टफोन, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृती धोक्यात आली आहे, असे विधान सर्रास केले जाते. प्रत्यक्षात मात्र बदलत्या आधुनिक काळात वाचनसंस्कृती आणखी मजबूत करण्यासाठी वाचनकट्टा संस्थेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पुस्तकांचा शोध’ हा व्हॉट्सअ‍ॅप गु्रप चालविला जात आहे. ग्रंथालय हे वाचनसंस्कृतीचे पारंपरिक माध्यम असले तरी याला पूरक असे काम या उपक्रमामुळे होत आहे.

सोशल मीडियावरील व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रुपच्या माध्यमातून केवळ पुस्तकांशी संबंधित पोस्ट करण्यासाठी हा वाचनप्रेमी ग्रुप तयार केला आहे. पुस्तकाच्या माहितीसह इतर साहित्यकृतींवर चर्चा, नव्या-जुन्या पुस्तकांची माहिती, संदर्भ त्यासंबंधी पोस्ट करून विचारणा केली जाते. त्याला ग्रुपवर जाणकारांकडून मार्गदर्शनही मिळते. कुणाला एखाद्या विषयावर वाचन करायचे असेल तर तो विषय पोस्ट केली जाते. त्यानंतर त्याविषयीच्या सविस्तर माहिती दिली जाते. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवर हा ग्रुप वाचन चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.दहा दिवसांत वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चाअनेक पुस्तकप्रेमी दहा दिवसांतून एका रात्री आठ ते दहा या वेळेत वाचलेल्या पुस्तकांविषयी आपले अनुभव सांगतात. ग्रुपवर पुस्तकाचा फोटो, प्रकाशक आणि इतर माहिती पोस्ट करतात. त्यामुळे एका पुस्तकाच्या अधिकाधिक माहितीचे संकलन नकळतपणे होते. महत्त्वाचे म्हणजे ग्रुपवर कोणतेही फॉरवर्ड मेसेज किंवा ग्रुप नियमबाह्य कृतीला प्रतिबंधक घातलेला आहे. 

प्रत्यक्ष भेटून गप्पांची मैफल...आजच्या धावपळीच्या आयुष्यात वाचनप्रेमी मित्र भेटणे तसे अवघडंच, अशा माध्यमातून मिळालेल्या लोकांशी पुस्तकांविषयी मनसोक्त चर्चा करतात.‘पुस्तकाचा शोध’ या उपक्रमामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर तर होतोच शिवाय वाचनसंस्कृती वृद्धिंगत होत आहे. एखादे पुस्तक प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून वाचतो. ग्रुपवर चर्चा करतो. त्यामुळे ते पुस्तक आकलन होण्यास आणखी मदत मिळते. नवनवीन पुस्तकांच्या शोधात असणाऱ्या तरुणवर्गातील वाचकांची संख्या या उपक्रमामुळे वाढणार आहे. या गु्रपवर राज्यभरातील शंभरहून अधिक युवक सक्रिय आहे.- युवराज कदम, संकल्पक वाचनकट्टा

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपSocialसामाजिक