शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

शेडा पार्कातील सामाजिक वनीकरणाची झाडे जळाली,लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:27 IST

FireKolhapurnews- कृषी विद्यापीठाच्या शेंडा पार्क येथील खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला मोठी आग लागून त्यामध्ये सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील वृक्षारोपण जळाले. सुमारे ३० हेक्टरपैकी २० हेक्टर जागेवर आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेडा पार्कातील सामाजिक वनीकरणाची झाडे जळालीलाखो रुपयांचे नुकसान : वीस हेक्टर परिसरातील गवत, झाडे जळून खाक

कोल्हापूर : कृषी विद्यापीठाच्या शेंडा पार्क येथील खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला मोठी आग लागून त्यामध्ये सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील वृक्षारोपण जळाले. सुमारे ३० हेक्टरपैकी २० हेक्टर जागेवर आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सकाळी दहा वाजता लागलेली आग सुमारे पाच तासाहून अधिक काळ सुरू होती. महापालिका अग्निशमन दलाच्या चार बंबांनी अथक्‌ परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.शेंडा पार्क येथे सुमारे ३० हेक्टर जागेत सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने तीन वर्षापूर्वी शतकोटी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण केले होते. झाडे पाच फुटाहून उंच झाली होती. येथे वाळलेले गवत कापणीचे कामही सुरु होते.

सोमवारी पूर्वेच्या ओढ्याकडून आग लागली. वाळलेले गवत असल्याने क्षणातच आग वाऱ्यामुळे पसरली. धुराचे लोट रस्त्यापर्यंत पोहचले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने दाखल झाले. पण घटनास्थळापर्यंत ते नेण्यास रस्ता नसल्याने अडचणी आल्या. खडकाळ जागेतून ही वाहने आत नेली. त्याद्वारे ही आग आटोक्यात आणली.

खडकाळ जागेतून अग्निशमनचे बंब आत नेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. नागरिक, विद्यार्थी तसेच वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारीही आग विझविण्यासाठी धावले. आगीत लाखो रुपयांची झाडे जळाली. अग्निशमनचे प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ जवानांनी चार बंबांसह शर्थीचे प्रयत्न केले.पक्षी, सरपटणारे प्राणी होरपळलेआगीमध्ये अनेक पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. गवत जळून खाक झाल्यानंतर त्यामध्ये अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी मृतावस्थेत सापडले.

ही आग कोणी वाईट हेतूने लावली का, यामध्ये किती लाखाचे वृक्ष जळून खाक झाले, याची चौकशी करण्यात येत आहे.- एस. बी. देसाई, वनपाल. 

टॅग्स :fireआगforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर