या आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मी मास्क वापरतो, तुम्हीसुद्धा वापरा या पालकमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत या परिसरातील नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना मास्कचे वाटप करून कोरोनाविषयी घ्यावयाची काळजी याची माहिती देऊन जनजागृती केली. या मोहिमेत मा. जि.प. सदस्य एकनाथ पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे सदस्य दिगंबर पाटील, किरण पाटील, विलास साठे, इस्पूर्लीचे सरपंच राजाराम पाटील, गजानन पाटील, निवास शेटे, शंकर मगदूम, मारुती निगवे, वडकशिवालेचे मा. सरपंच अमर पारळे, सुयोग वाडकर, प्रदीप शेटे, डॉ. रोहित पाटील, दतात्रय पारळे, दशरथ गुरुव, लखन बाबर, संजय पोर्लेकर, संजय नाईक, सचिन माळी यांसह परिसरातील कायकर्ते उपस्थित होते.
१३ सतेज पाटील
फोटो ओळ : इस्पूर्ली : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फळे वाटप करताना एकनाथ पाटील, गजानन पाटील, दिगंबर पाटील, निवास शेटे, किरण पाटील, विलास साठे, आदी उपस्थित होते.