अनिल पाटीलमुरगूड : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांकडून तसेच नेते मंडळीकडून बैठका, भेटीगाठी, तसेच आश्वासनांचा वर्षाव सुरू झाला आहे. दरम्यान, सुजाण नागरिकांनी शहरातील सात ते आठ प्रमुख चौकात लावलेल्या एका अनोख्या फलकाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.या फलकावर मोठ्या अक्षरांत लिहिले आहे –काय पाहिजे सांगा? “मी तुमचं काम करतो,पोरग्याला नोकरीला लावतो, सुनेची शाळेत ऑर्डर काढतो, बँकेत कामाला लावतो, कारखान्यात ऑर्डर काढतो... मग आता पतूर कुठं होतास?” अशा टोचून बोलणाऱ्या शैलीत हा प्रश्न विचारण्यात आला आहे. सदरचे फलक एस टी स्टॅन्ड, गणेश मंदिर, मुख्य रोड, हनुमान मंदिर, अंबाबाई मंदिर आदी ठिकाणी मध्यरात्री अज्ञातानी लावले आहे. लाल रंगातील हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.“सुजाण मुरगूडकर” या नावाने ते लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर या फलकाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी या उपरोधिक फलकाने वातावरणात वेगळीच रंगत आणली आहे.
Web Summary : As Murugud gears up for Nagar Parishad elections, mysterious banners questioning politicians' sudden promises have become the town's talking point. Signed by "Sujan Murgudkar," the banners target empty pre-election assurances, adding a unique twist to the political atmosphere.
Web Summary : मुरगुड नगर परिषद चुनावों की तैयारी में, अचानक किए गए राजनेताओं के वादों पर सवाल उठाने वाले रहस्यमय बैनर शहर में चर्चा का विषय बन गए हैं। "सुजन मुरगुडकर" द्वारा हस्ताक्षरित, बैनर चुनाव से पहले के खोखले आश्वासनों को लक्षित करते हैं, जिससे राजनीतिक माहौल में एक अनोखा मोड़ आता है।