शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे ते माझे नाव घ्यायला विसरले असतील, हातकणंगलेतील उमेदवारीवरुन संजय पाटलांनी धनंजय महाडिकांचा काढला चिमटा

By विश्वास पाटील | Updated: March 27, 2024 18:52 IST

या मतदारसंघात माझा संपर्क असून भाजपच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असल्याचा दावा

कोल्हापूर : हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातून इच्छुक म्हणून माझे नाव घेण्यास खासदार धनंजय महाडिक हे कार्यबाहुल्यामुळे विसरले असतील, असे सांगत या मतदारसंघातून भाजपकडून आपण प्रबळ दावेदार असल्याचा दावा मयूरचे डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.डॉ. पाटील म्हणाले, हातकणंगलेलोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी भूमिका आम्ही भाजपच्या राज्य नेतृत्वाकडे सातत्याने मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही आम्ही त्यासाठी आग्रह धरला व हा मतदारसंघ भाजपसाठी पोषक असल्याचे सांगितले; परंतु त्यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात आमच्या घरी भेट दिली तेव्हाही तुम्ही या मतदारसंघाबाबत आग्रह धरू नका, तो मिळण्याची एक टक्काही खात्री नसल्याचे स्पष्ट केले; परंतु त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे येईल, अशी भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली व शौमिका महाडिक त्या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. खासदार महाडिक कार्यबाहुल्यामुळे या मतदारसंघातून मीही लढण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यास विसरले असावेत.या मतदारसंघात यापूर्वी मी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे. सुमारे साडेतीन लाख मते त्यावेळी मिळाली होती. या मतदारसंघात माझा संपर्क असून भाजपच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाhatkanangle-acहातकणंगलेBJPभाजपाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक