शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहल बेंडके करणार ‘कॉमनवेल्थ’मध्ये पंचगिरी-पहिली भारतीय महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:59 IST

कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची आॅस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स् (राष्ट्रकुल स्पर्धा) सन २०१८ मध्ये बास्केटबॉल पंच म्हणून निवड झाली आहे.

ठळक मुद्देजागतिक बास्केटबॉल महासंघाकडून तिची निवड; कोल्हापूरचा सन्मान

कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची आॅस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स् (राष्ट्रकुल स्पर्धा) सन २०१८ मध्ये बास्केटबॉल पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून तिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड होणारी स्नेहल ही पहिली भारतीय महिला पंच ठरली आहे. या निवडीमुळे कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.

याबाबतची माहिती बास्केटबॉल पंच स्नेहल हिने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ती म्हणाली, आॅस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्ट येथे ५ ते १५ एप्रिलदरम्यान कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यासाठी जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून जगातून एकूण २४ पंचांची निवड झाली आहे. त्यात नऊ महिला असून त्यामध्ये माझा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये विविध स्पर्धांमधील पंच म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत महासंघाने माझी ‘कॉमनवेल्थ’साठी निवड केली. या निवडीची प्रक्रिया पाच महिन्यांची होती. या स्पर्धेत महिला गटांतील स्पर्धेसाठी मी पंच म्हणून काम पाहणार आहे. आजपर्यंत आपल्या देशातून बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात महिला पंच म्हणून कॉमनवेल्थ गेम्स्मध्ये कोणीही मजल मारू शकलेले नाही. हा सन्मान मला मिळाला आहे.

या निवडीमुळे आपल्या देशाला अधिकृतरित्या पंच म्हणून प्रतिनिधीत्व मिळाले आहे. या निवडीबाबतचे यश हे जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमित सरावामुळे मिळाले आहे. आजपर्यंतच्या माझ्या यशात आई-वडिलांसह भारतीय बास्केटबॉल महासंघ, राज्य बास्केटबॉल संघटनेचे पदाधिकाºयांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे.या पत्रकार परिषदेस वृंदा बेंडके, वैजयंती दळी, ऐश्वर्या मुनिश्वर, स्वरूपा शेटे, वासुदेव कुलकर्णी उपस्थित होते.विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरीजागतिक स्पर्धेत पंच म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून स्नेहल कार्यरत आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा सन २००९ मध्ये चेन्नई येथील वरिष्ठ महिला अशिया वुमेन चॅम्पियनशिपने झाली. त्यात सन २०१२ मध्ये लंडन येथील आॅलिम्पिक गेम्स्मधील वुमेन सेमीफायनलमध्ये पंच म्हणून काम करणारी ती पहिली भारतीय बास्केटबॉल पंच ठरली. अशिया सिनियर मेन्स् कप आणि अशिया चॅम्पियन कप या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तिची निवड झाली होती. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती ‘पहिली एशिया महिला पंच’ होती. ‘सिनीअर वुमेन वर्ल्ड चॅम्पियनशिप’साठी दोनवेळा तिची निवड झाली. सर्व वयोगटांतील एशिया पातळीवरील बास्केटबॉल पुरुष व महिला स्पर्धेमध्ये अकरा वेळा अंतिम सामना करणारी ती एकमेव भारतीय बास्केटबॉल पंच आहे.इनडोअर कोर्टसाठी शासनाने मदत करावीमहासंघाकडून झालेल्या निवडीमुळे मी खूप खूश आहे. बास्केटबॉलमध्ये कोल्हापुरातील महिला खेळाडूंचे प्रमाण वाढत आहे. त्याला बळ देण्यासाठी काही योजना मी नियोजित केल्या आहेत. याअंतर्गत असलेल्या इनडोअर कोर्टसाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा स्नेहल हिने व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि पंच म्हणून काम करणाºया महिलांचे प्रमाण वाढत आहे.