शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातून दारू आणणारे तस्कर जाळ्यात, खरेदीदार मात्र मोकाट

By उद्धव गोडसे | Updated: June 16, 2025 19:19 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासाला मध्येच लागतो ब्रेक; एकाही खरेदीदारावर कारवाई नाही

उद्धव गोडसेकोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या वाहनचालकांना आरोपी करून प्रकरण कागदोपत्री रंगवले जाते. पण, लाखो रुपयांची दारू मागवली कोणी? त्याचा खरेदीदार कोण आहे? त्याची विक्री कुठे आणि कशी होते? याचा शोध घेण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कधीच झालेले नाही. गेल्या वर्षभरात दारू तस्करीचे दोन हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. पण, यातील एकाही खरेदीदारापर्यंत उत्पादन शुल्कचे अधिकारी पोहोचले नाहीत, त्यामुळे तस्करांवरील कारवाया खरेदीदारांवरील दबाव वाढविण्यासाठीच असतात की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

शासनाचा कर चुकवून दारूची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पथके कार्यरत असतात. यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर कायमस्वरुपी तपासणी नाके तयार केले आहेत. प्रत्येक तालुक्यात भरारी पथके अवैध दारू वाहतुकीवर नजर ठेवतात. तरीही देशी दारूच्या अड्ड्यांपासून ते परराज्यातून येणाऱ्या दारूचा पूर सुरूच असतो. गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर दारू वाहतुकीचे दोन हजारांवर गुन्हे दाखल केले. यातील बहुतांश गुन्हे गोवा बनावटीच्या दारू तस्करीचे आहेत. दरवेळी वाहन पकडून त्यातील चालक आणि त्याच्या एखाद्या साथीदारावर कारवाई होते. यानंतर हे प्रकरण फारसे पुढे जात नाही.

अटकेतील आरोपीने दारू कोणाकडून खरेदी केली? राज्य आणि जिल्हा तपासणी नाक्यांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तस्करांची वाहने कोल्हापूरपर्यंत कशी पोहोचली? चंदगड, आजरा, भुदरगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील सीमाभागात गोवा बनावटीची दारू साठवण्याचे अड्डे कुठे आहेत? ते कोणाचे आहेत? गोवा बनावटीच्या दारूचे खरेदीदार कोण आहेत? छुप्या विक्रीची साखळी कशी सक्रिय आहे? याची चौकशी झाल्याचे दिसत नाही. तपास खोलात का जात नाही, याची कारणे शोधण्याची गरज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्माण झाली आहे.

  • गेल्या वर्षभरातील एकूण गुन्हे : २२५७
  • अटक आरोपी : २१५२
  • जप्त दारू : १४ हजार १८८ लिटर
  • जप्त दारूची किंमत : ६ कोटी २० लाख रुपये
  • जप्त वाहने : १६९
  • जप्त वाहनांची किंमत : २ कोटी ३२ लाख रुपये

रोज लाखो रुपयांची उलाढालगोवा बनावटीची दारू स्वस्तात मिळते. पण, त्याची महाराष्ट्रात विक्री करता येत नाही. यावर तस्करी आणि छुप्या विक्रीचा फंडा वापरला जातो. छुप्या विक्रीचे रॅकेट चालवणारे मोठे खरेदीदार गोव्यातून दारू मागवतात. तस्करी करून दारूचा पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. यातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दिली.

खरेदीदार मोकाटआजवर झालेल्या कारवायांमध्ये एकही खरेदीदार सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. वाहनचालकांच्या चौकशीतून खरेदीदारांची माहिती समोर येणे कठीण नाही. तरीही तपास का पुढे सरकत नाही, असा सवाल उपस्थित होतो.

अटक केलेल्या वाहनचालकांच्या चौकशीतून दारू मागविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण, बहुतांश वाहनचालक आपणच दारू खरेदी केल्याचे सांगतात. - स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग