शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

एसएमई लिस्टिंगसाठी कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्याचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 17:27 IST

भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(सूचीबद्ध) व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देभांडवल उभारणीसाठी ‘बीएसई-एसएमई’कडे वाढता कल : अजय ठाकूर कोल्हापूरमधील कंपन्यांसाठी प्रयत्न सुरूपश्चिम महाराष्ट्रात परिवर्तन होईल : ठाकूर

कोल्हापूर : भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाकडे कल वाढत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(सूचीबद्ध) व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.शेअरबाजार विषयक माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेनिमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकूर म्हणाले, बीएसई-एसएमईची सुरुवात सन २०१२ मध्ये झाली. ते देशातील पहिले एसएमई एक्सचेंज आहे. या एक्सचेंज अंतर्गत २१२ कंपन्या लिस्टिंग झाल्या आहेत.

कंपन्यांना व्यवसायातील नवीन संधी निर्माण होत असतात. त्यासह कर्जाची पुनर्रबांधणीसाठी त्यांना भांडवलाची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना त्यांची कंपनी बीएसई लिस्ट करुन आपले शेअर्स विकता येतात. त्यामुळे भांडवल उभारणीसाठी बीएसई-एसएमईकडील लिस्टिंगचा एक चांगला पर्याय आहे.

या पत्रकार परिषदेस सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिेसेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष विनय भागवत, एसपी वेल्थ अ‍ॅडव्हायझर्सचे अध्यक्ष अनिल पाटील, कंपनी सेक्रेटरी अमित दाधीच, आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात परिवर्तन होईलमुंबई, नागपूर, सूरत, अहमदाबाद कंपन्यांचा बीएसई-एसएमईमध्ये लिस्टिंग होण्यासाठी सहभाग वाढत आहे. पुण्यातील अनेक कंपन्यांची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, यातुलनेत आर्थिक साक्षरतेचा अभाव, शेअरबाजारची माहिती नसणे, लिस्टिंग झाल्यानंतर तक्रारी वाढतील अशा स्वरुपातील विविध भ्रमांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कंपन्या मागे आहेत. अशीच काहीशी पंजाब, दिल्लीमधील स्थिती होती. योग्य माहिती तेथील उद्योजक, कंपन्यांना मिळाल्याने त्यांचा सहभाग वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताºयामध्ये देखील अशा स्वरुपातील परिर्वतन होईल. यादृष्टीने येथे आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत......................................................................................(संतोष मिठारी)

टॅग्स :share marketशेअर बाजारkolhapurकोल्हापूर