शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिकेतील यंत्रसामुग्रीसाठी स्मॅकडून दोन लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:26 IST

Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur- निर्यातीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (स्मॅक) भवन येथे मोहनराव शिरगावकर सभागृहातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी स्मॅकचे अतुल पाटील होते.

ठळक मुद्दे निर्यातीसाठी शिरोली एमआयडीसीतील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार: खासदार संभाजीराजेरूग्णवाहिकेतील यंत्रसामुग्रीसाठी स्मॅकडून दोन लाखांची मदत

शिरोली : निर्यातीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (स्मॅक) भवन येथे मोहनराव शिरगावकर सभागृहातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी स्मॅकचे अतुल पाटील होते.माझ्या परिचयातील विविध देशांच्या राजदूतांच्या माध्यमातून शिरोली एमआयडीसीमध्ये उत्पादन केलेल्या मालाच्या निर्यातीसाठी प्रयत्न करणार आहे. संबंधितांचे संपर्क क्रमांक स्मॅकला देणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात प्रारंभी अतुल पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांचे पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत केले. तसेच उद्योजकांचे केंद्र स्तरावरील प्रश्न सांगितले. ईएससीआयच्या माध्यमातून सेवा दवाखाना मंजूर झालेला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव ह्यस्मॅकह्णने दाखल केला आहे.

याविषयी केंद्रात पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्या फंडातून दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. त्यामध्ये काही महत्वाच्या जीवनावश्यक यंत्रसामुग्री बसविण्याकरिता सर्व औद्योगिक संघटनांनी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने स्मॅककडून दोन लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश अतुल पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी स्मॅकचे सचिव जयदीप चौगले, खजिनदार एम. वाय. पाटील, आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, संचालक प्रशांत शेळके, सोहम शिरगावकर, राजेंद्र वारनूळकर, रवी डोली, मिलिंद पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर