शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

गतीमंद बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू ! गडहिंग्लज तालुक्यात हळहळ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 11:41 IST

Accident Gadhinglaj Kolhapur : हातपाय धुण्यासाठी शेततळ्याकडे गेलेल्या गतीमंद बालकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. वेदांत राजेश पवार (वय ९, मूळ गाव निपाणी, जि. बेळगांव, सध्या रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. 

ठळक मुद्देगतीमंद बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू ! गडहिंग्लज तालुक्यात हळहळ :करंबळी येथील हृदयद्रावक घटना

गडहिंग्लज : हातपाय धुण्यासाठी शेततळ्याकडे गेलेल्या गतीमंद बालकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. वेदांत राजेश पवार (वय ९, मूळ गाव निपाणी, जि. बेळगांव, सध्या रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. ग्रामस्थ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मंगळवार (२०) दुपारी वेदांत हा इंद्रायणी पाटील यांच्या शेततळ्याकडे गेला होता. दरम्यान, हातपाय धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी शेततळ्यात गेला होता. त्यावेळी पाय घसरून तो शेततळ्यात पडला.गतीमंद असल्यामुळे त्याला हालचाल व आरडाओरड करता आली नाही. आजूबाजूलाही कोणी नसल्यामुळे त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.शोधाशोध करतांना त्याचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला.त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील व बहिण असा परिवार आहे.मारूती वांद्रे यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. हेडकॉन्स्टेबल विठ्ठल मुळीक अधिक तपास करीत आहेत.हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशवेदांत हा लहानपणापासूनच आजोळी करंबळीमध्ये राहत होता. त्यामुळे आजी-आजोबांचा त्याच्यावर खूप लळा होता. एकुलत्या मुलाच्या दुर्देवी मृत्यूने आई-वडीलांसह आजी-आजोबांनी व बहिण वैष्णवीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर