शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: शिंदे गटाच्या खासदारांसमोरच कोल्हापुरात मुख्यमंत्र्याविरोधात घोषणाबाजी, तणावाचे वातावरण

By पोपट केशव पवार | Updated: October 31, 2023 13:08 IST

राज्य सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब लागत असल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवतील प्रदक्षिणा घालत राज्य सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून आरक्षण दिले नाही तर मी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून तुमच्या या लढ्यात सहभागी होईन असे सांगत मंडलिक यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्ना केला.मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी खा. मंडलिक यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार यांनी गायकवाड समितीचा अहवाल कोर्टात सादर केला नसल्याने आरक्षण मिळाले नाही. संसदेत तुम्ही याचा जाब का विचारत नाही असा सवाल खा. मंडलिक यांना केला. यावर मंडलिक यांनी मी मराठा समाजाबरोबरच आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना मी आरक्षणाबाबत आपल्या भागाची भूमिकाही समजावून सांगितली आहे. त्यामुळे कोणत्याही परस्थितीत आरक्षण मिळायलाच हवे यासाठी मी आग्रही असल्याच सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी व शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी खा.मंडलिक यांच्यासमोर मुख्यमंत्र्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, मंजित माने, राजू यादव, महेश उत्तुरे, शुभांगी पवर उपस्थित होते.

शिंदे गटाचे खासदार सामुदायिक राजीनामे देतीलशिंदे गटाचे आमदार व खासदार यांची आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईत बैठक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची दाहकता लक्षात येण्यासाठी सर्वच खासदारांनी सामुदायिक राजीनामे देण्याबाबत विनंती करणार असल्याचे खा.मंडलिक यांनी सांगितले. जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSanjay Mandalikसंजय मंडलिक