स्वच्छता अभियानात सहा टन कचरा उठाव, सलग ४२ व्या रविवारी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:13 PM2020-02-17T15:13:51+5:302020-02-17T15:16:05+5:30

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये रविवारी राबविलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा हा ४२ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचा सहभाग होता.

Six tonnes of garbage collected in sanitation drive | स्वच्छता अभियानात सहा टन कचरा उठाव, सलग ४२ व्या रविवारी मोहीम

 कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत पद्माराजे उद्यानाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छता अभियानात सहा टन कचरा उठाव, सलग ४२ व्या रविवारी मोहीम विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने शहरामध्ये रविवारी राबविलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा हा ४२ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचा सहभाग होता.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वाईट प्रवृत्तीचे प्रबोधन करून तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोल्हापूर शहर १ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त झाले पाहिजे, यासाठी शहरातील सर्व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालयेही प्लास्टिकमुक्त तसेच पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करणार असल्याचे सांगितले.

यावेळी स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, आर. के. ग्रुप, स्वच्छतादूत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.सी.सी.चे विद्यार्थी, वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था व महापालिकेचे सफाई कर्मचारी सहभागी होते. आर. के. ग्रुप यांनी दौलतनगर येथील जगदाळे शाळा येथे वृक्षारोपण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, शाखा अभियंता आर. के. पाटील, कनिष्ठ अभियंता एस. एन. भाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार उपस्थित होते.

स्वच्छता केलेला परिसर

गांधी मैदान, पंचगंगा नदीघाट, रिलायन्स मॉलचा संपूर्ण परिसर, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप व माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी मार्केट, हुतात्मा पार्क, टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते लोणार वसाहत मेन रोड तसेच पद्माराजे उद्यान, कळंबा तलाव.

महापालिकेची यंत्रणा

  • पाच जेसीबी
  • सहा डंपर
  • सहा आरसी गाड्या.

 

 

 

Web Title: Six tonnes of garbage collected in sanitation drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.