शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ए.एस. ट्रेडर्सचे सहा संचालक दुबईला पळाले; तक्रारीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी  

By उद्धव गोडसे | Updated: April 17, 2023 18:21 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे सहा संचालक देश सोडून दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे सहा संचालक देश सोडून दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे. या संचालकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये देशाबाहेर पाठवल्याचा अंदाज ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गुंतवणूकदारांनी सोमवारी (दि. १७) पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तपास गतिमान करण्याची विनंती केली.

कमी कालावधित जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंट परागंदा झाले आहेत. पाच महिन्यात २७ पैकी केवळ एका संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असून, अन्य संचालक अटक टाळण्यासाठी न्यायालयात हेलपाटे घालत आहेत. यातील प्रमुख सहा संचालक सध्या दुबईत असल्याची माहिती कंपनीच्या काही संचालकांनीच ऑनलाईन बैठकीत दिली. प्रमुख संचालकांनी कंपनीचे कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय ए.एस. विरोधी कृती समितीने वर्तवला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदारांना परतावा मिळत नाही. कंपनीची कार्यालये बंद आहेत. संचालक किंवा एजंट समोर येऊन गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. आता परतावे मिळण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय मुद्दलही अडकल्यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन तपास गतिमान करण्याची विनंती केली.

तक्रारी देण्यासाठी रिघ लागलीए.एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. यातील बहुतांश ग्रुपवर सध्या कंपनीच्या विरोधातील नाराजी तीव्र झाली आहे. यातून तक्रारदारांची संख्या वाढत असून, सोमवारी ५० हून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत गर्दी केली. फसवणूक झालेल्या इतरही गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर