शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सीपीआरमधील स्थिती : आत रूग्ण तर बाहेर नातेवाईक तळमळताहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:09 IST

जिल्ह्याचे प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये एकीकडे रूग्ण उपचार घेत असताना बाहेर असणाऱ्या नातेवाईकांची मात्र परवड सुरू आहे. या ठिकाणी किमान एखादी धर्मशाळा उभारावी अशी मागणी होत आहे.

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये एकीकडे रूग्ण उपचार घेत असताना बाहेर असणाऱ्या नातेवाईकांची मात्र परवड सुरू आहे. मंगळवारी रात्री या ठिकाणी भेट दिली असता नातेवाईकांना झोपायलाही धड जागा नाही, डासांचा उच्छाद आणि पिण्याचे पाणीही विकत अशी परिस्थिती पहावयास मिळाली. या ठिकाणी किमान एखादी धर्मशाळा उभारावी अशी मागणी होत आहे.सीपीआर हे केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर निपाणीपासून कोकणापर्यंतच्या अनेक ठिकाणचे रूग्ण येथे दाखल होतात. सांगली जिल्ह्यातील जवळ असणाऱ्या तालुक्यातील रुग्णही येथे उपचारासाठी आणले जातात. ज्यांना कोणी वाली नाही त्यांना ‘थोरला दवाखाना’ अशी या रुग्णालयाची महती आहे.मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रूग्ण दाखल झाले असताना त्यांच्या नातेवाईकांचे मात्र बाहेर हाल सुरू असतात. या ठिकाणी पाच छाेटे, मोठे शेड उभारण्यात आले आहेत. परंतु ही सुविधा अपुरी आहे. यामध्ये सुधारणा नाही केली तर रुग्णांच्या नातेवाईकांचे असेच हाल सुरू राहणार आहेत.

रुग्णासोबत एकजणही थांबू शकत नाहीशस्त्रक्रिया, प्रसूती झालेल्या रुग्णांजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची मुभा आहे. परंतु गंभीर, अतिगंभीर रूग्ण जे अतिदक्षता विभागात आहेत तेथे कोणालाच थांबता येत नाही. या ठिकाणी बाहेरच थांबावे लागते.

पिण्याचे पाणी विकतचशासकीय रुग्णालयातील पाणी न पिण्याची आता नागरिकांचीही मानसिकता झाली आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये ज्यांना परवडते ते नातेवाईक २० रूपये लीटरचे शुद्ध पाणी आणतात. तर स्वयंसेवी संस्थेच्यावतीने या ठिकाणी १ रुपया लीटर शुद्ध पाणी उपलब्ध आहे त्याचा लाभ नागरिक घेतात. मात्र ही सोय २६ जानेवारी २०२२ ला उपलब्ध झाली आहे.

नातेवाईकांची रात्र व्हरांड्यातचसीपीआरच्या आवारात छाेटे, मोठे पाच शेड्स आहेत. पण ते अपुरे आहेत. या ठिकाणी नातेवाईकांची ये- जा, जेवण, कपडे तिथेच वाळत घालणे यामुळे स्वच्छता राखण्यावरही मर्यादा येतात. या शेड अपुऱ्या पडत असल्याने मग व्हरांड्यातही नातेवाईक झोपण्याची सोय करून घेतात.

मी कोल्हापुरातच साने गुरूजी वसाहतीत राहतो. भावाला येथे दाखल केले आहे. या ठिकाणी माईकवरून गरज पडल्यास नातेवाईकांना बोलावले जाते. त्यामुळे फार लांब जावून चालत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठा कट्टा आहे. त्यावरच झोपतो. -अमित बुचडे, कोल्हापूर

आईला गँगरीन झाले आहे म्हणून येथे उपचारासाठी आणले आहे. आम्ही बाहेर उघड्यावरच झोपतो. पण दिवसा उन्हाचा मोठा त्रास होतो. याच ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याची गरज आहे. स्वच्छतागृह, अंघोळीसाठीही पैसे माेजावे लागतात. -शशिकांत लोहार, बहिरेवाडी ता. पन्हाळा

सध्या सीपीआरच्या आवारामध्ये नेमकी किती जागा शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर नातेवाईकांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने धर्मशाळा उभारण्याचा प्रयत्न आहे. -डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल