शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Everest Trekking : एव्हरेस्टवर अजूनही परिस्थिती जैसे थे, प्रचंड वाऱ्यासह बर्फवृष्टी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:49 IST

Everest Trekking : वेगवान वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्या एव्हरेस्ट मोहिमेला सलग तिसऱ्या दिवशीही खीळ बसली आहे. अजूनही तिच्यासह तीनशे जण वेदर विण्डो मिळेल या आशेवर कॅम्प दोनवर तळ ठोकून आहेत. मात्र, कॅम्प दोनवर असलेली कस्तुरी सावेकर आणि इतर गिर्यारोहक सुरक्षित आहेत, अशी माहीती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांना शुक्रवारी मिळालेली आहे.

ठळक मुद्देएव्हरेस्टवर अजूनही परिस्थिती जैसे थे, प्रचंड वाऱ्यासह बर्फवृष्टी सुरूच कस्तुरीसह इतर गिर्यारोहक सुरक्षित

कोल्हापूर : वेगवान वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्या एव्हरेस्ट मोहिमेला सलग तिसऱ्या दिवशीही खीळ बसली आहे. अजूनही तिच्यासह तीनशे जण वेदर विण्डो मिळेल या आशेवर कॅम्प दोनवर तळ ठोकून आहेत. मात्र, कॅम्प दोनवर असलेली कस्तुरी सावेकर आणि इतर गिर्यारोहक सुरक्षित आहेत, अशी माहीती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांना शुक्रवारी मिळालेली आहे.कॅम्प दोनवर अजूनही प्रचंड वाऱ्यासह बर्फवृष्टीमुळे १० फुटांच्या पुढचे काहीही दिसत नाही. तंबूही मोठ्या प्रमाणात ओले झाले आहेत. त्यात कपडेही ओली झाली आहेत. ती वाळण्याची संधी नाही. खाण्याचे साहित्यही संपत आले आहे. कॅम्प दोनवरुन खालीही जाता येत नाही आणि वरही जाता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी स्नो फॉलमुळे सॅटेलाईट फोन काम करत नव्हते. बेसकॅम्पवरूनही कॅम्प दोनवर साहित्य येऊ शकत नाही. तरीसुद्धा हिंमत न हारता कस्तुरीसह अन्य गिर्यारोहक वेदर विण्डो मिळेल, अशा आशेवर आहेत. सर्व गिर्यारोहक धीराने आणि संयमाने या परिस्थितीशी सामना करत आहेत, एकमेकांना मदत करत आहेत, अशी माहिती गिरीप्रेमींचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी दिली आहे.दोन दिवसांपूर्वी एक शेर्पा कॅम्प दोनवर कमरेखालून गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचाराची गरज होती. त्याला कसेतरी करून आज सकाळी बेसकॅम्पला उतवरण्यात इतर शेर्पांना यश आले आहे. बेस कॅम्पवरुन लुक्लाहून आलेल्या एका हेलीकॉप्टरमधून त्याला हलवण्यात यश आले आहे. स्नो फॉलमुळे हेलीकॉप्टरसुद्धा नीट उडू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.कस्तुरी व अन्य गिर्यारोहक सुरक्षितकस्तुरी सावेकरचे वडील दीपक सावेकर यांना मिळालेल्या माहीतीनुसार सॅटेलाइट फोनद्वारे बेस कॅम्पशी सकाळी संपर्क साधला गेल्यानंतर कस्तुरीसह अन्य गिर्यारोह सुखरूप आहेत, अशी माहीती मिळालेली आहे. उद्या सकाळ नंतर वातावरण क्लिअर होईल असा हवामानाचा अंदाज आहे.

समीट पूर्ण करूनच कोल्हापुरात परतू, कस्तुरीमध्ये आशावादतौउतेसह यास वादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोहिमेत सर्वांत कमी वयाची कस्तुरी आहे. आपल्याला वेदर विण्डो मिळेल आणि समीट आपण पूर्ण करूनच कोल्हापुरात परतू, असा आशावाद कस्तुरीमध्ये आहे. म्हणूनच अजूनही ती खडतर अशा कॅम्प दोनवर इतर गिर्यारोहकांसह तळ ठोकून आहे. श्री महालक्ष्मी अंबाबाई , दख्वनचा राजा श्री जोतिबा , व आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आर्शीर्वाद पाठीशी असल्या कारणाने कस्तुरी सह सर्व गिर्यारोहक शेर्पालोक सुखरूप आहेत, असे दीपक सावेकर यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Everestएव्हरेस्टkolhapurकोल्हापूरTrekkingट्रेकिंग