शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सारथीच्या उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:28 IST

Maratha Education Sector : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम महाविद्यालयातील जागांची बुधवारी पाहणी केली. त्यांनी या जागांची प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालयांतील जागांचा समावेश शनिवारी होणार निश्चिती

 कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम महाविद्यालयातील जागांची बुधवारी पाहणी केली. त्यांनी या जागांची प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतली.शिवाजी विद्यापीठ (राजेंद्र नगरकडील परिसर), राजाराम महाविद्यालय (प्री-आयएएस ट्रेनिंगजवळील परिसर), विचारेमाळ येथील समाजकल्याण विभाग आणि सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांची पालकमंत्री सतेज पाटील आणि सकल मराठा समाजातील समन्वयक वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आदींनी सोमवारी पाहणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संबंधित चारही जागांची तांत्रिक माहिती संकलित केली आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पहिल्यांदा राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील जागेची पाहणी केली. या जागांची त्यांनी प्राथमिक स्वरूपातील माहिती जाणून घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, करवीर तहसीलदार कार्यालयातील अस्लम शेख, राजाराम महाविद्यालयातील डॉ. प्रवीण कोडोलीकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, या जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्यातील एक जागा शनिवारी (दि. २६) खासदार संभाजीराजे, आदींनी पाहणी केल्यानंतर निश्चित होणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.राजर्षी शाहू मिलच्या जागेवर उपकेंद्र व्हावेशहरातील राजर्षी छत्रपती शाहू मिलची २८ एकर जागा रिकामी आहे. त्याठिकाणी ह्यसारथीह्ण संस्थेचे उपकेंद्र व्हावे. या जागेत उपकेंद्राबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कृषी केंद्र करावे, अशी मागणी मराठा ऑर्गनायझेशनच्यावतीने ऋतुराज माने, राजवर्धन बिरंजे आदींनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रmarathaमराठाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीShivaji Universityशिवाजी विद्यापीठ