गडहिंग्लज : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी उत्तूर (ता. आजरा) येथील इंदिरानगरतर्फे शुक्रवारी (दि. १२) सकाळी ८ वाजता १६०० मीटर धावणे स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना अनुक्रमे रुपये ३००१, २००१, १००१, ५०१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
----------------------------------
२) गायत्री पाटीलला कांस्यपदक
गडहिंग्लज : लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथील धावपटू गायत्री मलगोंडा पाटील हिने गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत २००० मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकाविले. तिला क्रीडा शिक्षिका बिरेंदर आळसुळे-कौर, सदाशिव आडसुळे यांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले. तिची खेलाे इंडियातर्फे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड होणार आहे.
* गायत्री पाटील : १००२२०२१-गड-०३
----------------------------------
३) ‘लोकमान्य’चा शुक्रवारी वर्धापनदिन
गडहिंग्लज : लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या येथील शाखेचा ८ वा वर्धापनदिन शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत होत आहे. यानिमित्त हळदी कुंकू, महापूजा व सत्यनारायण पूजा होईल, अशी माहिती क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी दिली.