शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधार नोंदणी ९८.४२ टक्के पूर्ण

By admin | Updated: May 30, 2017 18:13 IST

आधार नोंदणी केंद्रावरच करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. ३0 : जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम मे अखेरील ९८.४२ टक्के झाले असून उर्वरीत नोंदणी व आधार मधील बदल अशा सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूर्व परवानगीने सुरु असलेल्या आधार नोंदणी केंद्रावरुनच करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सध्या आधार नोंदणी संकेतस्थळाच्या अद्यवतीकरणाचे काम सुरु असून केंद्र सरकार कडून वेळोवेळी आज्ञावलीमध्ये बदल करण्यात येत आहेत. आधार नोंदणी करतेवेळी आधार मशीन सोबत जीपीएस उपकरण लावणे बंधनकारक असल्याने आधार नोंदणी कोणत्या भागातून झाली आहे याची नोंद मिळण्यास मदत होत आहे. आधार केंद्रावरुन वापरली जाणारी आज्ञावली ही आधार संस्थेने विकसित केलेली असून देशातील सर्व आधार केंद्रावरही एकच आज्ञावली वापरली जात आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रचालकांना आधार कायदा २0१६ बद्दल मार्गदर्शन करण्यात आलेले असून आधार नोंदणीतील चुकांच्या कामगिरीबाबत दंडाची आकारणी देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आधार नोंदणीचे काम पुर्वी एनपीएसटी या संस्थेकडून होत होते. या संस्थेकडून जिल्ह्यात आधार नोंदणी किटचे असमान वाटप झाल्याने जिल्ह्यातील काही भागातील लोकांना बऱ्याच दुरवरचे अंतर कापावे लागत होते. असे ब-याच आधार केंद्रचालकांना तत्कालीन एनपीएसटी कंपनीकडून कोणतेच सहयोग मिळत नव्हते. ती व्यक्ती जिल्ह्याबाहेर राहत होती व जिल्ह्यातील केंद्रचालकांना दूरध्वनीवरुन देखील उध्दट उत्तरे मिळत होती.  

जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन जिल्ह्यातील आधार नोंदणीचे काम थेट सी. एस. सी. कंपनीकडे दिले. जिल्ह्यातील प्रत्येक जि. प. गणामागे एक केंद्रचालक अशी जिल्हा परिषदेच्या गणाची जबाबदारी दिली आहे. हे केंद्रचालक स्वत:चे केंद्रातून तसेच वेळोवेळी ज्या त्या जि. प. गणातील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांशी व तलाठ्यांशी संपर्क साधून गरज भासल्यास ज्या त्या ग्रामपंचायतमध्ये कॅम्प लावणार आहेत. अशा पध्दतीने जिल्ह्यातील प्रत्येक जि. प. मतदार संघनिहाय वाटप झाल्याने व जिल्ह्यातील आधरच्या कामामध्ये केंद्रचालकांना तांत्रिक मदत होत असल्याने सर्वस्तरावरुन समाधान व्यक्त केले जात आहे. नागरीकांनी आधारकार्ड नोंदणी करतेवेळी ओळखीचा व पत्याचा पुरावा म्हणून नमूद केलेली मूळ कागदपत्रे सोबत असणे बंधनकारक आहे.

ओळखीचा पुरावा- जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, रहिवासी दाखला फोटो लावून (ग्रामसेवक), शाळेचे ओळखपत्र/ बोनाफाईड, रेशनकार्ड (फोटो असलेले), ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शनर फोटो कार्ड, मतदान कार्ड. पत्याचा पुरावा- बँक पासबुक, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला फोटो लावून (ग्रामसेवक), पोस्ट आॅफीस पासबुक, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईटबिल ३ महिने. तसेच प्राप्त झालेल्या आधार कार्डमध्ये नावात बदल करावयाचे असल्यास जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, राजपत्र (गॅझेट) प्रत, प्रतिज्ञापत्र नावात बदल केल्याचे (विवाहानंतरचे), विवाह दाखला (फोटो आवश्यक), पॅनकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड (फोटो असलेले), शाळेचे ओळखपत्र/ बोनाफाईड, पत्यात बदल करायचे असल्यास बँक पासबूक, रहिवासी दाखला फोटो लावून (सरपंच/ नगराध्यक्ष), जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रेशनकार्ड. जन्मतारीख बदल करायचे असल्यास जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला (माध्यमिक).

कोष्टकानुसार ज्या त्या कामासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या यादीतील कोणतेही कागदपत्रांची मूळप्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. हे कागदपत्र स्कॅन करुन आपणास परत करण्यात येतील. आधार केंद्रचालकांनी आधार नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांक प्राप्त न झाल्यास सर्व प्रथम आधीच्या नोंदणीची पावतीनुसार तपासून पहावे खात्री झाल्यानंतरच पुर्ननोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.