शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लग्नसराईंची नांदी, आचारसंहितेत अडकली हुपरीची 'चांदी'

By पोपट केशव पवार | Updated: March 22, 2024 12:59 IST

बिल दाखवूनही जप्त केला जातोय माल

पोपट पवारकोल्हापूर : चांदीच्या कलाकुसरीमुळे देशभर प्रसिद्ध असलेला हुपरी परिसरातील चांदी व्यवसाय ऐन लग्न सराईच्या काळातच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडचणीत आला आहे. हुपरी परिसरातून पाठविले जाणारे चांदीचे दागिने, त्यातून मिळणारे पैसे देशभरातील चेकपोस्टवर जप्त केले जात असल्याने या परिसरातील सहा हजार उद्योजकांना बनवलेल्या चांदीचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे बनवलेला माल परराज्यात पाठवणेच बंद केल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ४० हजार कामगारांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.हुपरी (ता. हातकणंगले) या परिसरात चांदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. चांदीचा व्यवसाय करणारे सहा हजार उद्योग या परिसरात आहेत. येथील सर्व माल बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थानसह देशभरात पाठवला जातो. परप्रांतात चांदीचे दागिने पुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांकडे जातेवेळी तयार दागिने असतात, तर येतेवेळी चोख चांदी, कच्ची चांदी, चांदीची मोड तसेच काही रक्कम असते. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. पैसे, सोने, चांदी, अशा मौल्यवान वस्तूंची प्रत्येक चेकपोस्टवर तपासणी होते. खरेदी-विक्री केल्याचे बिल असूनही चेकपोस्टवर चांदी व्यावसायिकांचा माल, पैसे जप्त केले जात आहेत. या पैशाशी, मालाशी निवडणुकीचा कोणताही संदर्भ नसल्याचे पुरावे देऊनही त्यांना सोडले जात नसल्याने हे व्यावसायिक हतबल झाले आहेत.

रोज तीन टन पैंजणहुपरी परिसरात रोज चांदीचे तीन टन पैंजण बनवले जातात. हा माल देशभर पाठवला जातो. सध्या लगीनसराई सुरू आहे. पैंजणला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, याच काळात आचारसंहिता सुरू असल्याने माल पाठवण्यास उद्योजक घाबरत आहेत. मागणी असूनही माल पाठवता येत नसल्याने उद्योजकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

चांदी व्यवसाय दृष्टिक्षेपात-उद्योग-६ हजार-कामगार-४० हजार-रोज बनते तीन टन पैंजण

हुपरीतून देशभरात चांदीचा माल पाठवला जातो. आचारसंहिता काळात या मालाची वाहतूक करताना उद्योजकांनी नेमकी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत याबाबत प्रशासनाने आम्हाला सांगावे. - मोहन खोत, अध्यक्ष, चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSilverचांदीCode of conductआचारसंहिता