शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन : १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:22 IST

Maratha Reservation : कोल्हापुरातून दि. १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंगले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला आता, आक्रमकपणा काय असतो तो दाखवू, अशा गर्भित इशाराही गुरुवारी दिला.

ठळक मुद्देपाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन : १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवातपुुणे-मुंबई लॉगमार्च काढणार : समाजाची ताकद दाखविणार - खासदार संभाजीराजे

कोल्हापूर : समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिलं आरक्षण ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमीतून म्हणजेच कोल्हापुरातून दि. १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंगले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला आता, आक्रमकपणा काय असतो तो दाखवू, अशा गर्भित इशाराही गुरुवारी दिला.कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली, त्यावेळी खासदार संभाजीराजे बोलत होते. कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही, कोल्हापुरातील संसर्ग तर राज्यातील सर्वांत जास्त असल्याने मोर्चाऐवजी प्रातिनिधिक आंदोलन करावे, अशी सूचना बैठकीत आल्यामुळे संभाजीराजे यांनी मोर्चाऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनात सहभागी व्हावे. आम्ही या आंदोलनात कोणीच बोलणार नाही; पण आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिक स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नुसती पत्रे नकोत. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करा. आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार ते ठोसपण सांगा, असेही आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर