शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

आजऱ्यात बहुरंगी लढतीचे संकेत : , नेतेमंडळींची कसोटी लागणार,नगरपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:23 AM

आजरा : भाजपची ताराराणी पुरस्कृत शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँगे्रस पुरस्कृत आघाडी, माजी सरपंच जनार्दन टोपलेंची बंडखोरी, शिवसेनेचे स्वबळ आणि मुस्लिम समाजातील काही गटांचा सवता सुभा

ठळक मुद्देराष्ट्रवादी-काँगे्रसची आघाडी निश्चित

कृष्णा सावंत ।आजरा : भाजपची ताराराणी पुरस्कृत शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँगे्रस पुरस्कृत आघाडी, माजी सरपंच जनार्दन टोपलेंची बंडखोरी, शिवसेनेचे स्वबळ आणि मुस्लिम समाजातील काही गटांचा सवता सुभा यामुळे आजरा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत बहुरंगी लढतीचे संकेत मिळत असून निवडणुकीत अनिश्चितेचे सावट गडद होत असल्याने सर्वच पक्षांतील नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे.

भाजपचे अशोक चराटी व सहकाºयांनी मोठ्या जिद्दीने आजरा नगरपंचायत मंजूर करून आणली. मात्र, त्यांचेच सहकारी कारखाना संचालक आणि माजी सरपंच जनार्दन टोपले यांनी सदस्यपदासाठी स्वत:, तर नगराध्यक्षपदासाठी पत्नी स्मिता टोपले यांनी स्वंतत्र अर्ज भरून बंडेखारीचे सुतोवाच केले आहेत. टोपले स्वतंत्र आघाडी करण्याच्या तयारीत असल्याने भाजपसाठी टोपले यांची डोकेदुखी ठरणार आहेत.

राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँगे्रसची आघाडी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. काँग्रेससोबत चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदयराज पोवार, कृष्णा पटेकर आदी मंडळींनी सावध पवित्रा घेत हालचाली गतिमान केल्या आहेत. काँगे्रसचे आमदार सतेज पाटील, जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष विद्याधर गुरबे, जि. प. सदस्य उमेश आपटे, तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर यांनी अल्पावधीत जम बसवायला सुरुवात केली आहे.

शिवसेनेच्या स्वबळाच्या नात्यामुळे संभाजी पाटील व विजय थोरवत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी आघाडीकडून पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र, सेनेच्या स्वबळामुळे पाटील, थोरवत यांना तडजोडीची भूमिका घ्यावी लागणार आहे.

पंधरवड्यापूर्वी मुस्लिम समाजातील आप्पा खेडेकर, आबुताहेर तकिलदार, आदमसाब माणगावकर यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली होती. या गटासोबत आमदार सतेज पाटील, जनार्दन टोपले व शिवसेना यांनीही आता स्वतंत्रपणे चर्चा चालू ठेवल्याने हे गट कुणाच्या हाताला लागतात याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, भाजपचे अशोक चराटी, विलास नाईक, प्रा. सुधीर मुंज, डॉ. अनिल देशपांडे, अरुण देसाई, विजय पाटील, सुरेश कुंभार, आनंदा कुंभार, मलिककुमार बुरूड यांनी सर्वसमावेशक भूमिका घेत मुस्लिम समाजालाही काही जागा देऊन शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे.मुस्लिम समाजाचे मतदान आता विखुरले जाणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने बहुरंगी लढतीमुळे निवडणूक रंगतदार अवस्थेकडे झुकली आहे. त्यामुळे सर्वच नेतेमंडळींची कसोटी पणाला लागणार आहे.राष्टÑवादीची उमेदवारी निश्चितराष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रसच्यावतीने जि. प.च्या माजी सदस्या अलका शिंपी यांचे नाव निश्चित मानले जाते, तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अद्याप अनिश्चित असून जोत्स्ना पाटील, चराटी, स्मिता कुंभार यांची नावे चर्चेत आहेत. स्मिता टोपले यांनाही अपक्ष म्हणून निश्चित मानले जात आहे.