शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस वाढल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत लक्षवेधी वाढ; मात्र 'या' तालुक्यातील स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:45 IST

पावसाचे पाणी भूगर्भात चांगल्या प्रकारे मुरल्यानंतर भूजल पाणी पातळीत वाढ होते

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : दोन, तीन वर्षे पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने कागल तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. याउलट राधानगरी तालुक्यातील पाणी पातळी नीचांकी गेली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील भूजल पातळी अहवालावरून असे चित्र समोर आले आहे.पावसाचे पाणी भूगर्भात चांगल्या प्रकारे मुरल्यानंतर भूजल पाणी पातळीत वाढ होते. यासाठी कृषी, सामाजिक वनिकरण, वनविभागातर्फे माथा ते पायथा या सूत्रानुसार पाणी मुरण्यासाठीचे उपचार जमिनीवर केले जातात. पाच वर्षात सरासरी जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे, असे भूजल सर्वेक्षण प्रशासनाचे म्हणणे आहे. 

९९ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यातील ९९ विहिरीतील पाणी पातळीचे निरीक्षण जानेवारी २०२२ अखेर करण्यात आले. निरीक्षण घेताना जमीन पातळीपासून विहिरीतील पाणी पातळी यंदा किती आहे. त्याच विहिरीची पाणी पातळी गेल्या पाच वर्षात किती होती, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.कागल तालुक्यात सर्वात वर पाणीजिल्ह्यात सर्वात वर पाणी पातळी कागल तालुक्यातील आहे. या तालुक्यातील उंदरवाडी, बोरवडे, कुरुकली, मुरगूड, गलगले या पाणलोट क्षेत्रात सर्वात वर पाणी आहे.राधानगरीची स्थिती चिंताजनकराधानगरी तालुक्यात सर्वात खाली पाणी पातळी गेली आहे. या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. पण जमिनीत पाणी कमी मुरते आणि वाहते अधिक अशी स्थिती आहे.

भूगर्भातील पाणी पातळी विविध ठिकाणी भिन्न असते. पण पाणी पातळी वाढण्यासाठी विहीर पुनरभरणाच्या उपाययोजना वाढविण्याची गरज आहे. शहरात कॉंक्रिटीकरण वाढल्याने पाणी कमी मुरते. यामुळे शहराभोवतची पाणी पातळी खालावत असते. -उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ 

जास्तीत जास्त कुटुंबांनी छतावरील पाणी साठवून जमिनीत मुरवावे. विंधनविहिरीचे पुनरभरण करावे. पावसाचे पाणी अडवून मुरविण्यासाठीच्या उपाययोजना केल्या पाहिजे. - अनिल चौगुले, पर्यावरण तज्ज्ञ

 

कोणत्या तालुक्याची भूजल पातळी किती? (मीटरमध्ये)

तालुका जानेवारी २०१७ ते २०२१ मधील सरासरी पाणी पातळी जानेवारी २०२२
आजरा ३.१०  २.९०
भुदरगड ३.८२   ३.७५
चंदगड ६.७१    ६.६४
गडहिंग्लज २.७६  २.८०
गगनबावडा ५.९८  ५.८५
हातकणंगले ३.६७   ३.५६
कागल १.७७    १.३९
करवीर २.६४  २.६१
पन्हाळा ३.१२   ३.२५
राधानगरी २.२७  २.२८
शाहूवाडी ४.३६   ४.३२
शिरोळ ३.५९      ३.५१
टॅग्स :kolhapurकोल्हापूर