शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

विशाळगड, उदगिरी, आंबा, अणुस्कुरा घाटात गुन्हेगारी जोरात : पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:35 IST

विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण

ठळक मुद्देपर्यटनस्थळे गुन्हेगारीचे माहेरघर-- शाहूवाडीत गुन्हेगारीचे हॉटस्पॉट

- आर. एस. लाड ।आंबा : कोल्हापूरच्या सीमेवरील विशाळगड, उदगिरी, आंबा व अणुस्कुरा घाट हा निसर्गरम्य व ऐतिहासिक ठिकाणे निर्जन व दुर्गमतेमुळे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनत आहेत. शुक्रवारी विशाळगड मार्गावरील कोकण पॉर्इंटवर इंचलकरंजीच्या तरुणांनी वर्चस्वाच्या ईर्षेतून संतोष तडाखेला येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणूून रस्त्यापासून केवळ वीस फुटांवर गळा चिरून दरीत फेकले. दीड वर्षापूर्वी मानोली धरणावरील झाडीत रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर सडलेल्या मृतदेहाचा पंचनामा करावा लागला. चार वर्षांपूर्वी पावनखिंडीत भीक मागणाऱ्या एका धनगराच्या वृद्धेला मारून टाकले होते. निर्जनता, दुर्गमता व पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे गुन्हा करून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी ही दुर्गम ठिकाणे सोईची होत असल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. त्याची दहशत स्थानिकांची डोकेदुखी बनत आहेच, शिवाय येथील निसर्ग पर्यटनाला छेद देणारी ठरत आहे.

विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अवैध व्यावसायांनी गडावर पुन्हा डोके वर काढले. उदगिरी व धोपेश्वर ही देवस्थानेही जंगलातील आहेत. जुगाई येथील पावणाई मंदिर उदगिरीतील काळाम्बाई येथेही कोंबड्याचा बळी देणारी, लिंबू जपणारी देवदेवस्कीची अंधश्रद्धा जपली जाते. त्यातून गुन्हेगारी घटनांना बळ मिळते. गेल्या दोन वर्षांत ग्रामीण भागात चोरीचे प्रमाणही वाढले आहे.

घातपात की अपघातगेळवडे जलाशयाचे बॅक वॉटरचे पात्र केंबुर्णेवाडी ते गजापूर असे चार किलोमीटर रस्त्यालगत विस्तारले आहे. विशाळगडावर येणारा भाविक या जलाशयावर अंघोळ, कपडे व वाहन धुणे, भोजनासाठी येथे विसावतो; पण जलाशयाचा अंदाज नसल्याने अंघोळीस जाणाऱ्यांना जलसमाधी मिळालेल्या घटना दरवर्षी येथे घडतात. बाराजणांना येथे जलसमाधी मिळाल्यानंतही येथे बंदी घालण्याचे प्रशासनाला सूचलेले नाही. प्रथमदर्शनी अपघात कधी कधी घातपात तर नसावा, असा प्रश्न येथे पडतो. आपत्कालीन व्यवस्थेची या भागात मोठी गरज आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी