शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ऑफिसला जातो म्हणून गेला अन्..; बेपत्ता सिद्धार्थचा पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 12:26 IST

सिद्धार्थ वाझे बेपत्ता होऊन चार दिवस उलटले

कोल्हापूर : टाकाळा परिसरातील एस.व्ही. एन्टरप्रायझेस शेअर ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख सिद्धार्थ राजू वाझे (वय २६, रा. शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) हा गुरुवारी (दि. १६) सकाळी ऑफिसला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. तो अद्याप घरी परतला नाही. दोन्ही मोबाइल ऑफिसमध्ये ठेवून मुलगा बेपत्ता झाल्याने वडील राजू नायकू वाझे (वय ५५) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ वाझे याने वर्षभरापूर्वी टाकाळा येथे एका अपार्टमेंटमध्ये एस.व्ही. शेअर ट्रेडिंग कंपनी सुरू केली. तो रोज सकाळी दहाच्या सुमारास ऑफिसमध्ये जात होता आणि सायंकाळी परतत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी तो ऑफिसमध्ये जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचे दोन्ही मोबाइल बंद लागत होते.अखेर वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिसांत दिली. दुसऱ्या दिवशी वडिलांनी बनावट चावीने एस.व्ही. एन्टरप्रायझेसचे ऑफिस उघडून पाहिले असता, फ्लाइट मोडवर टाकलेले सिद्धार्थचे दोन्ही मोबाइल मिळाले. अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने हृदयविकाराचे रुग्ण असलेल्या वडिलांना धक्का बसला असून, वाझे कुटुंबीय चिंतेत आहे.कारण काय?सिद्धार्थ वाझे बेपत्ता होऊन चार दिवस उलटले आहेत. पोलिसांना अजूनही त्याचा ठावठिकाणा मिळालेला नाही. तो अचानक का निघून गेला? त्याला शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले होते काय?, त्याच्यावर कोणाचा दबाव होता काय? अशा अनेक कारणांची चर्चा सध्या सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMissingबेपत्ता होणं