शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेस सुरुवात, भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:16 IST

आज, गुरुवारी धुपारती सोहळ्याने होणार सांगता

जोतिबा : क्षेत्र जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेस प्रारंभ झाला असून, हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. आज, गुरुवारी सकाळी ६ वाजता धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सुरक्षितेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासकीय यंत्रणा व स्थानिक ग्रामस्थ पुजारी सज्ज झाले आहेत. बुधवारी रात्रभर भाविक जोतिबा डोंगरावर येतच राहिले. चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला. षष्ठी यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर भरते. भाविक उपवास करून येतात आणि दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याच्या घरी सोडतात.

जोतिबा मंदिरात धुपारती धार्मिक विधी कार्य झाले. चोपडाई देवीची उत्सव महापूजा बांधण्यात आली. मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर भागातून लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेला आले होते. जोतिबा डोंगर रात्रभर जागा होता. भाविकांनी पुजाऱ्यांच्या घरांत असरा घेतला. पुजाऱ्यांच्या घरी महिलांची रात्रभर पुरणपोळी करण्याची लगबग सुरू होती. सलग तीन वर्ष श्रावण षष्ठी केल्यावर श्री.चोपडाई देवीला साडी चोळी देऊन अभिषेक करून षष्ठी उजविण्याचा धार्मिक विधी पुजाऱ्यांमार्फत केला जातो. नारळयुक्त लिंबू असलेला राखणीचा नारळ प्रसाद म्हणून घरी नेतात.जोतिबा मंदिरात रात्रभर सुरू असणारी धुपारती बुधवारी सकाळी ६ वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी उंट-घोडे वाजंत्री देव सेवक श्रीचे पुजारी या लवाजम्यासह बाहेर पडेल. गुलाल खोबऱ्यांची उधळण करून भाविक पुजाऱ्यांच्या घरी पुरणपोळी नेवैद्य व नारळमुक्त लिंबूचा राखणीचा नारळ घेऊन परतीच्या मार्गाला लागतील. दरम्यान, यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडी, धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस निरीक्षक कैलास कोडग, ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगण तळ ठोकून होते.