शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By भारत चव्हाण | Updated: May 20, 2024 19:16 IST

नगरोत्थानमधील रस्त्यांच्या कामातील त्रूटींमुळे धरले जबाबदार

कोल्हापूर : शंभर कोटींच्या सोळा रस्त्यांच्या कामास होत असलेला विलंब, कृती समितीने केलेले आंदोलन, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली दखल आणि टोचलेले कान यामुळे महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. या कामात अधिकाऱ्यांत योग्य समन्वय नसल्यामुळे संतप्त  झालेल्या मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत १०० कोटींच्या निधीतून शहरातील १६ मुख्य रस्ते करण्यात येत आहेत. यातील मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या रस्त्यावर डांबरीकरणानंतर पुन्हा खुदाई केल्याच्या तक्रारी प्रशासक मंजूलक्ष्मी यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यांच्या कामाची त्यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर अभियंता सतिश फप्पे, आर.के.पाटील, महादेव फुलारी उपस्थित होते. या ठिकाणी दिसून आलेल्या कामातील त्रुटी, या संबंधित विभागात समन्वय नसल्यामुळेच निर्माण झाल्या असल्याचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. आधी सेवावाहिन्यांची कामे पूर्ण करुन घेणे अपेक्षित असताना ती घेतली नसल्याने रस्ते पुन्हा उकरावे लागले. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून कामातही विलंब होत आहे. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासकांच्या लक्षात आले.

कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड, खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक, माऊली चौक ते हुतात्मा चौक येथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची प्रशासकांनी पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी ड्रेनेजचे मेनहोल, युटीलीटी व इतर बाबी डांबरीकरण करताना समन्वयाअभावी डांबरीकरणाच्या खाली गेल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नागरिकांशी प्रशासकांनी संवाद साधला. त्यांच्या कामाबाबतीत तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. अधिकारी व ठेकेदार यांना सर्व कामे दर्जेदार, विहित मुदतीत व टेंडरमधील स्पेसिफिकेशन प्रमाणे पूर्ण करुन घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्तेवर अथवा गटारीमध्ये पाणी तुंबून कोणाच्याही घरात जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर