शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची ३८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:50 IST

CoronaVirus Teacher Kolhapur : प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी गैरहजर राहिले. त्यामुळे उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.

ठळक मुद्देमहापालिकेची ३८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने कारवाई

कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी गैरहजर राहिले. त्यामुळे उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विभागीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वॉर रुम, अलगीकरण व विलगीकरण कक्ष या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था विभाग सुरू केला आहे. या विभागात अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. लसीकरण डाटा संकलन, स्वॅब डाटा संकलन,सर्वेक्षण, कोविड पॉझिटिव्ह नागरिकांची चौकशी, ॲन्टिजन टेस्ट डाटा संकलन, वॉर रुममार्फत शहरातील बेड उपलब्धतेची माहिती गरजू नागरिकांना देण्याचे काम त्यांना दिले आहे.महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या शिक्षकांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या शिस्तभंगाची व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथ नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२०मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये म्हणून उप-आयुक्त आडसुळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. संबंधितानी या नोटिसीचा लेखी खुलासा २४ तासात देऊन नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर रहाण्याबाबत आदेश दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर