शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बेंच खरेदीप्रकरणी १0 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:00 IST

दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण आणि वित्त विभागातील १० अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांकडून १0 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.

ठळक मुद्देबेंच खरेदीप्रकरणी १0 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसासहा वर्षांपूर्वीचे प्रकरण, १0 दिवसांत मागितला खुलासा

कोल्हापूर : दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण आणि वित्त विभागातील १० अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांकडून १0 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.जिल्हा नियोजन मंडळातून नावीन्यपूर्ण योजनेतून सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बेंच देण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. तिरूपती ट्रेडिंग कंपनी (बीड) आणि अथर्व ट्रेडिंग कंपनी (औरंगाबाद) यांना याचे कंत्राट द्यावे, असे आदेश पुण्यातून शिक्षण विभागाने दिले होते.त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र बेंच पुरविल्यानंतर त्यातील बेंचच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी, हा निकष डावलून बेंच पुरवठा करण्याआधीच टेस्ट रिपोर्ट देण्यात आला होता, तसेच ९० टक्के आणि १० टक्के अशा दोन टप्प्यांत दोन कोटी रुपयांची रक्कम अदा करणे आवश्यक असताना, संपूर्ण रक्कम एकाचवेळी अदा करण्यात आली आहे.दरम्यान, २०१३/१४ च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकनासाठी आलेल्या पंचायतराज समितीने या खरेदी प्रक्रियेबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले होते.मित्तल हे पंचायतराज समितीच्या साक्षीसाठी मुंबईत होते. गुरुवारी पुण्यात बैठकीसाठी थांबून ते कोल्हापुरात आल्यानंतर तब्येत बरी नसल्याने रजेवर होते. अखेर सोमवारी त्यांनी या कारणे दाखवा नोटिसांवर सह्या केल्या.यांना निघाल्या नोटिसातत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश पाटील, वरिष्ठ लेखाधिकारी व विद्यमान मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, लेखाधिकारी राजेंद्र नागणे, तत्कालीन सहायक लेखाधिकारी प्रकाश काटकर, तत्कालीन कनिष्ठ लेखाधिकारी संतोष ओतारी, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. वाय. अघम (सेवानिवृत्त), तत्कालीन उपशिक्षणाधिकारी दिनकर हरी पाटील (सेवानिवृत्त), तत्कालीन कनिष्ठ लेखाधिकारी संभाजी हंकारे, वरिष्ठ सहायक (लेखा) अरुण पोवार (सेवानिवृत्त), तत्कालीन कनिष्ठ सहायक नामदेव गाताडे. 

 

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर