शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:12 IST

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे.

ठळक मुद्दे धान्य, किराणा दुकानांसह अन्य व्यापार बंद व्यापारी-व्यावसायिकांचा उद्यापासून जनता कर्फ्यू

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या कालावधीत कृषी, बी-बियाणे आणि साहित्य विक्री, औषध दुकाने, दूधविक्रीची दुकाने आणि शहर, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू राहणार आहेत. किराणा-भुसारी, धान्यासह अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहतील.या कर्फ्यूचा निर्णय कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी (दि. ८) जाहीर केला. त्यातील निर्णयानुसार शहरातील कृषी, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहतील. धान्य, मसाला, खाद्यतेल, किराणा-भुसारी, प्लायवूड, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी., ऑटोमोबाईल, आदींशी संबंधित अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. गुजरी येथील सराफ व्यावसायिकांची दुकानेही बंद राहतील.

या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारे धान्य, आदी साहित्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत खरेदी करावे. व्यापारी, व्यावसायिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असल्याने बँका सुरू ठेवण्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.नागरिकांनी साथ द्यावीआपला आणि इतरांचा जीव वाचला, तर व्यवसाय-व्यापार चालणार आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूचे पालन करावे. नागरिक, ग्राहक सुरक्षित राहावेत या उद्देशाने आम्ही सहा दिवसांचा कर्फ्यू पाळणार आहोत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. घरातून बाहेर पडू नये. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी या कर्फ्यूचे कडकपणे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले.राजारामपुरीतील दुकाने राहणार सुरूया जनता कर्फ्यूमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी आणि कामगार वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. जनता कर्फ्यू करूनही काही व्यवसाय, उद्योग चालू, तर काही व्यवसाय बंद राहतील. अशा प्रकारे उपाययोजना करून कोरोना आटोक्यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनता कर्फ्यूपेक्षा ही व्यक्तिगत काळजी, जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय, सॅनिटाईजिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर अधिक आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची काळजी घेऊन राजारामपुरी परिसरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी आणि सचिव रणजित पारेख यांनी दिली. दरम्यान, राजारामपुरी परिसरात विविध लहान-मोठी १२०० दुकाने आहेत. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर