शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सासूच्या निधनाचा धक्का, सूनेनेही सोडला आपला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 14:20 IST

दोघींमधील नाते माय-लेकीसारखे होते. त्यामुळे सासूच्या निधनाचा मंगल यांना मोठा धक्का बसला

कोल्हापूर : वृद्धापकाळात सासूची आईसारखी सेवा केलेल्या सुनेला सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांचेही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची घटना कोल्हापुरातील दुधाळी, उत्तरेश्वर पेठ परिसरात शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेने सासू-सुनेच्या नात्यामध्ये किती जिव्हाळा असू शकतो याचा प्रत्यय दिला असला तरी आई आणि पत्नीला गमावण्याची वेळ एका दुर्दैवी पतीवर आली. येथील बाबूराव परशराम शेटके यांच्या आई लक्ष्मीबाई परशराम शेटके (वय ९०) यांचे गुरुवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. सासू लक्ष्मीबाईंची सून मंगल यांनी पहिल्यापासूनच चांगली सेवा केली होती. या दोघींमधील नाते माय-लेकीसारखे होते. त्यामुळे सासूच्या निधनाचा मंगल यांना मोठा धक्का बसला. लक्ष्मीबाई यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकून घरातील मंडळी घरी येण्याआधीच मंगल शेटके (६१) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना त्वरित पंचगंगा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आईच्या निधनाने दु:ख सागरात बुडालेल्या बाबूराव शेटके यांना काही वेळातच पत्नीच्याही निधनाचा मोठा धक्का बसला. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे तर मंगल शेटके यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवारी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर