लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यामुळे सीमाभागात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याच्या निषेर्धात कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने बुधवारी सकाळी शिवाजी चौक येथे मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. शिवाजी चौक येथे सकाळी अकराच्या सुमारास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र, अभिमानाची गोष्ट ’, यासह कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी दीपक गौड, संजय गांधी समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे, जयवंत हारूगले, रणजित जाधव, विशाल देवकुळे, सुनील जाधव, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, सुनील खोत, रमेश खाडे, विजय देसाई, युवा सेना शहरप्रमुख चेतन शिंदे, पीयूष चव्हाण, अविनाश कामते, माथाडी कामगार सेना शहरप्रमुख राज जाधव, गजानन भुर्के, शाम जाधव, सुनील भोसले, अश्विन शेळके, सागर घोरपडे, सुनील करंबे, राजू काझी, विनय वाणी, सचिन भोळे, पद्माकर कापसे, राजू ढाले, कपिल सरनाईक, ओमकार परमणे, उदय भोसले, शिवाजी सावंत, महादेव पोवार, किरण पाटील, हर्षल पाटील, गजानन तोडकर, दिनेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, यशवंत पाटील, आदी उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे रोशन बेग यांच्या पुतळ्याचे दहन
By admin | Updated: May 26, 2017 00:53 IST