शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणापेक्षा शिवराज्याभिषेक सोहळा महत्वाचा : संभाजीराजे छत्रपती

By संदीप आडनाईक | Updated: May 31, 2024 16:11 IST

तयारी पूर्ण : पाच लाखांहू्न अधिक शिवभक्त रायगडावर येणार

कोल्हापूर : राजकारण आणि शिवराज्याभिषेक मी एकत्र आणणार नाही, एक वेळ निवडणुका आणि राजकारण पुन्हा होतील, पण ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एकदाच होणार आहे. त्यामुळे ४ जूनपेक्षाही ५ आणि ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळाही माझ्यासाठी महत्वाचा आहे, असे मत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराज छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तर, यंदा दुर्गराज रायगडावर पाच लाखांहून अधिक शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी झाला. त्या क्षणाची स्मृती रहावी म्हणून २००७ पासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. प्रारंभी दोन हजार शिवभक्त होते, गतवर्षी ५ लाख शिवभक्त गडावर होते. यंदाही हा आकडा ओलांडून जाईल असे संभाजीराजे म्हणाले.यावेळी समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी समितीने पूर्ण झाली असून, एकुण ३७ समित्या नियोजनबध्द काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.५ जून हा शौर्य आणि ६ जून हा भक्तीचा दिवस आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी ५ ठिकाणी अन्नछत्र आहे. शाहीरी कार्यक्रमात २३ शाहीर पोवाडे गाणार आहेत, पालखी मिरवणुकीत १०० मशाली आणि संबळवाद्य असेल, युध्दकला प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी राज्यातून ३५ संघ आणि २५० मावळे सहभागी होणार आहेत. पायथ्याला आणि गडावर मिळून ११ ठिकाणी आरोग्य केंद्र सज्ज राहणार आहेत, धर्मशाळा व इतर ठिकाणी महिलांसह इतर शिवभक्तांची थांबण्याची व्यवस्था केल्याचीही माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अमर पाटील, हेमंत साळोखे, सुखदेव गिरि, फत्तेसिंग सावंत, धनाजी खोत, उदय घोरपडे, प्रविण उबाळे, धनाजी खोत, दिलिप सावंत, अनुप महाजन, रणजित पाटील, दीपक सपाटे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.

असा आहे शिवराज्याभिषेक सोहळा५ जून : दुपारी ३.३० वा : जिजाउ समाधीचे दर्शन (पाचाड), सायंकाळी ४ वा. संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती पायी गड चढण्यास प्रारंभ (नाणे दरवाजा), ४.३० वा : महादरवाजा पूजन व तोरण बांधणे, ५ वा : पंचक्राेशीतील २१ गावांतील सरपंच, गावकऱ्यांच्या उपस्थितीत शहाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन (नगारखाना), ५.३० वा. धार तलवारीची युध्दकला महाराष्ट्राची शिवकालीन युध्दकलांची मानवंदना (होळीचा माळ), ७.१५ वा. आतषबाजी, रात्री ८ वा : जागर शिवशाहीरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा (राजसदर) , ९ वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ (शिरकाई मंदिर), रात्री ९.३० वा. वारकरी संप्रदायाकंडून कीर्तन व भजन (जगदीश्वर मंदिर), ६ जून : सकाळी ७ वा :रणवाद्यांच्या जयघोषात शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन (नगारखाना), ७.३० वा. शाहिरी कार्यक्रम (राजसदर), ९.३० वा. शिवरायांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन (राजसदर), १०.१० वाजता संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायाच्या उत्सवमूर्तीस अभिषेक (राजसदर) , १०.२० वा. शिवरायांच्या पुतळ्यास सुवर्णनाण्यांचा अभिषेक (मेघडंबरी), १०.३० वा. सभांजीराजे यांचे मार्गदर्शन, ११ वा. जगदीश्वराच्या दर्शनासाठी शिवरायांच्या मुख्य पाालखी सोहळ्यास प्रारंभ, १२ वा. जगदीश्वराचे दर्शन, १२.१० वाजता शिवरायांच्या समाधीस अभिवादन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती