कोल्हापूर : चैतन्यमय वातावरणात शनिवारी ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. शिवाजी चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. घरोघरी भगवे ध्वज आणि गुढ्यांमुळे शहर शिवमय बनले होते. शिवाजी चौक, निवृत्ती चौकात शिवभक्त सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी येत होते. ह्यछत्रपती शिवाजी महाराज की जयह्ण या घोषणांनी परिसर दणाणून गेला.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दरवर्षी शहरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. . त्यानुसार शनिवारी तो शिवाजी चौकामध्ये साजरा झाला. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, महापौर निलोफर आजगेकर, आमदार चंद्रकांत जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी महापौर आर. के. पोवार, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, बबनराव रानगे, कादर मलबारी, लाला गायकवाड, प्रकाश पाटील, सुनील पाटील, शिरीष जाधव, रामचंद्र पोवार, सुशांत डाफळे, विजय करजगार, के. एम. बागवान हे उपस्थित होते.पोवाड्याच्या माध्यमातून अवतरली शिवशाहीअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवाजी चौकात शाहीर दिलीप सावंत यांचा ह्यशाहिरी मुजराह्ण हा कार्यक्रम झाला. शाहीर सावंत यांनी शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर सादर केलेल्या पोवाड्यांनी शिवाजी चौकात अवघी शिवशाही अवतरली.भगवे झेंडे आणि गुढ्याकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी येथे साध्या पद्धतीने सोहळा साजरा करण्यात आला. घराघरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून भगवे झेंडे आणि गुढ्या उभ्या करण्यात आल्या. त्यामुळे शहरात उत्साही वातावरण होते.
चैतन्यमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन सोहळा, घरोघरी भगवे ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:49 IST
कोल्हापूर : चैतन्यमय वातावरणात शनिवारी ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. शिवाजी चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ...
चैतन्यमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन सोहळा, घरोघरी भगवे ध्वज
ठळक मुद्दे घरोघरी भगवे ध्वज, गुढीने शहर बनले शिवमय छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार : विविध मंडळांकडून सामाजिक उपक्रम