शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

करवीरनगरीत शिवरायांचा जयघोष : शिवजयंतीनिमित्त पुतळ्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:43 IST

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी...’ अशा जयघोषात

ठळक मुद्दे शिवाजी तरुण मंडळाचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी...’ अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.दुपारी बारा वाजता गंगावेश येथून या मिरवणुकीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, कोठीशाळा, अर्धा शिवाजी पुतळा चौकअशी मिरवणूक काढण्यात आली. तिचा समारोप उभा मारुती चौकात झाला.

यात माजी नगरसेवक पिंटू राऊत, सदाभाऊ शिर्के, सुरेश जरग, चंद्रकांत पाटील, लालासाहेब गायकवाड, उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश इंगवले, अक्षय मोरे, अभिजित राऊत, गिरीश साळोखे, भानुदास इंगवले, सुरेश साळोखे, प्रियांका इंगवले, दीप्ती सावंत, गीता इंगवले, सानिका इंगवले, जयश्री राऊत, भाग्यश्री इंगवले, वैष्णवी इंगवले, सुप्रिया झेंडे, सुजाता मोरे, रेखा मोरे, सुनंदा चव्हाण, आक्काताई सरनाईक, वैशाली जाधव, सुजाता पोवार, नंदा नाईक, आदी शिवभक्त व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जागोजागी अश्वारूढ पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली.लक्षवेधी कमानउभा मारुती चौकात ऐतिहासिक किल्ल्याची ३० फुटी काल्पनिक कमान उभी केली आहे; तर ४५ फुटी स्टेजवरही दोन्ही बाजूंना हत्ती आणि मधोमध शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे. यावर विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे ही कमान व एकूणच येथील वातावरण उत्साही व लक्षवेधी ठरत आहे.ही कमान व स्टेजवरील सजावट बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे. याचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, आदी मान्यवर उपस्थित होते.शिवजयंती उत्सवानिमित्त कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर