शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांना मानाचा मुजरा शिवराज्याभिषेक दिन : मराठा महासंघातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:42 IST

‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽ ऽ’ ,‘जय भवानी, जय शिवाजी’चा अखंड जयघोष, भिरभिरणारे भगवे झेंडे, ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळे, समाजप्रबोधनाचे फलक आणि मर्दानी खेळांची चित्तथरारक

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽ ऽ’ ,‘जय भवानी, जय शिवाजी’चा अखंड जयघोष, भिरभिरणारे भगवे झेंडे, ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळे, समाजप्रबोधनाचे फलक आणि मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा वातावरणात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.

शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा रायगडावर झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी मराठा महासंघाच्यावतीने मंगळवार पेठ येथील जिल्हा कार्यालयापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पूजन खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते करून मिरवणुकीची सुरुवात झाली. यात सहभागी रिक्षांवर समाजप्रबोधनपर फलक लावण्यात आले होते. त्यापाठोपाठ मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात येत होती. ती पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथील ढोल व झांजपथकाने मिरवणुकीत उत्साह संचारला होता. यासह सद्गुरू ज्ञानेश्वर माउली भजन मंडळ, विठ्ठल भक्त मंडळ, आदी भजनी मंडळांनी सहभागी होऊन मिरवणुकीत एक वेगळेच चैतन्य आणले होते.

अनेक शिवप्रेमी मिरवणुकीत बाल शिवाजी, जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक येथे या मिरवणुकीची सांगता झाली.

मिरवणुकीचे आयोजन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले होते. मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, उद्योजक चंद्रकांत जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, रामेश्वर पतकी, शशिकांत पाटील, भगवानराव काटे, बबन रानगे, डॉ. शिवाजीराव हिलगे, महादेवराव पाटील, अवधूत पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रवीण कोडोलीकर, नीलेश साळुंखे, भारती पाटील, नेहा मुळीक, आदी सहभागी झाले होते.महिलांचा उल्लेखनीय सहभागअखिल भारतीय मराठा महासंघातर्फे काढण्यात आलेल्या बुधवारच्या मिरवणुकीत मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या कणेरीवाडी, उजळाईवाडी येथील महिला भगव्या साड्या व भगवे फेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या.शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा रायगडावर झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मंगळवार पेठ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज