शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

कोल्हापुरात ब्रॅण्डेड चहावाल्यांना टक्कर देतेय मिस चायवाली

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 6, 2025 18:37 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : मिस चायवाली. सुवासिनीनं कुंकवाला आणि मर्दानं चहाला कधी नगं म्हणू नये.., चहाला वेळ नसते, पण वेळेला ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : मिस चायवाली. सुवासिनीनं कुंकवाला आणि मर्दानं चहाला कधी नगं म्हणू नये.., चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच.. अशा कितीतरी बिरुदावलीतून आपल्या दैनंदिन जीवनात चहाचे महत्त्व अधोरेखित होते.. चहाची तलफ झाली की, आपण आधी चहावाला शोधतो, पण चहावालाच का? कारण तो पुरुष असतो.. या पारंपरिक मानसिकतेला छेद, ब्रॅण्डेड चहावाल्यांना टक्कर देत आहे मिस चायवाली.. म्हणजेच शिवानी पाटील.हॉकी स्टेडिअम चौकातून पुढे रामानंद नगरकडे निघालो की, उजव्या कोपऱ्याला ‘मिस चायवाली’ असा बोर्ड दिसतो. स्वच्छ, चकाचक गाडीवर २१ वर्षांची ही तरुणी मुरलेल्या व्यावसायिकांप्रमाणे ग्राहकांना हवा तसा फक्कड चहा, कॉफी करून देते. सर्वांशी मोकळेपणाने संवाद, ग्राहकाला दुसऱ्यांदा तिच्या गाडीवर यायला भाग पाडतो. वडील पांडुरंग, आई सविता आणि शिवानी असे हे त्रिकोणी सुखी कुटुंब. पण दोन वर्षांपूर्वी वडील कॅन्सरने दगावले, आई आजारी असल्याने कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली. घराचे ११ लाखांचे कर्ज फेडत घर चालवण्याची दुहेरी कसरत आहे. सध्या ती गोखले कॉलेजमधून बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षात बहिस्थ (एक्सटर्नल) शिकते. रात्री आठनंतर अभ्यास करते. तिची ही धडपड पाहून रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत व डॉ. महादेव नरके यांच्या पुढाकारातून संस्थेने तिला १ लाखाची नवी कोरी, मोठी चहाची गाडी बनवून दिली आहे. आता ती पोहे, उप्पीट, शिरा, वडापाव, मिसळसारखे नाष्ट्याचे पदार्थ सुरू करणार आहे. लेकीच्या या धडपडीचा आईला अत्यंतिक अभिमान आहे. तिच्या या कष्टाला सामाजिक पाठबळाची गरज आहे.

स्वावलंबनाचे साैंदर्य हवेचेहऱ्यावर साधी पावडरसुद्धा नसलेल्या शिवानीची मुलींनी भारी कपडे, मेकअपपेक्षा आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वावलंबी असावे, अशी धारणा आहे. व्यवसाय करताना मुलगी म्हणून समोरची व्यक्ती मला विचित्र वाटली तर मी दुर्लक्ष करते, संवाद टाळते. गाडीवर वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक येतात, त्यांच्याशी कसे वागायचे हे मी अनुभवातून शिकते. मुलींमध्ये हे धाडस यावे, असे तिचे मत आहे.

प्रत्येक मुलामुलींनी कुटुंबाच्या गरजा ओळखून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भावनिक होऊन व्यवसाय करायचा नाही. कोणतेही काम छोटे नसते, आपण त्यात जीव ओतून, नवी संकल्पना आणत काम करायचे. त्या कष्टाचे फळ नक्की मिळते. - शिवानी पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूर